इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपूरी :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नाशिक जिल्हा ग्रामिण पोलिस दल इगतपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने “रन फॉर युनिटी (मॅरेथॉन)” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. देशातील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या मॅरेथॉनचे आयोजन नाशिक ग्रामीण दलाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव, पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी व शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय पोलिस हवालदार विनोद गोसावी व निलेश देवराज, इगतपुरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड्स अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या मॅरेथॉन स्पर्धेस इगतपुरी शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी विद्यार्थीणी, तरुण महिला-पुरुष, आदिवासी महिला भगिनी, शिक्षक, समाजसेवक, तसेच इगतपुरी पोलिस स्टेशन, लोहमार्ग पोलिस स्टेशन, RPF चे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संखेने मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.
‘एकता दौड’ इगतपुरी पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून राम मंदिर येथून पुन्हा इगतपुरी पोलिस स्टेशन पर्यंत पार पडली. सहभागी धावपटूंनी राष्ट्रीय एकतेचा जयघोष देत वातावरण देशभक्तीने भारले.
शेवटी कार्यक्रमाचा समारोप हा उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर व पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करून “एक भारत, श्रेष्ठ भारत” चा संकल्प व्यक्त केला.
