श्रीक्षेत्र माहूर ता प्रतिनिधि अरविंद खंदारे
माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शेकडो घरकुलांच्या हप्त्याची रक्कम माहूर नगरपंचायतने थकविल्याने गोरगरीब लाभार्थ्यावर कर्जापाई आत्महत्या करण्याची वेळ आल्याने सोमवारी हप्त्याची रक्कम न टाकल्यास सोमवार दि 19 सामाजिक कार्यकर्ते आकाश रमेश कांबळे हे उपोषणाला बसले आहेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी प्रयत्न करूनही दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने लाभार्थी संतप्त झाले असून शहरातील वातावरण तंग बनले आहे
माहूर नगरपंचायत कडून गेल्या अनेक महिन्यापासून घरकुलाचे हप्ते टाकण्यास टाळाटाळ करण्यात येत असून घरकुल लाभार्थ्यांचे हप्त्याची रक्कम इतरत्र वळविल्याची चर्चा जोरात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यात घबराटीचे वातावरण पसरले असून याआधी अनेक मान्यवरांनी आंदोलने निवेदने करूनही नगरपंचायत वर कुठलाच फरक पडला नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आकाश रमेश कांबळे यांनी निवेदनाद्वारे सोमवारपासून रक्कम टाकणे सुरू न केल्यास सोमवारपासूनच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता घरकुलाचे हत्याची रक्कम टाकण्यात न आल्यामुळे ते सोमवारपासून उपोषणास बसले या ठिकाणी अजय नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे ता दंडधिकारीअभिजीत जगताप नगरसेविका सौ कविता राजू सौदलकर नगरसेविका सौ सागर विक्रम राठोड माझी गटनेतील सय्यद रहमत अली एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख सज्जाद युवा नेते इरशाद मकरानी वंचित बहुजन आघाडीचे विजय भगत दादाराव गायकवाड जमीर भाई नागपुरवाले रेणुकादास वानखेडे रणधीर पाटील राजू शेख इकबाल शेख शेर आली सौंदलकर अरविंद खंदारे सुदाम इलियास बावानी पवार भाऊराव मोहिते सदबा मुंडे किसन दामा राठोड़ रेणुकादास बेलखोडे प्रदीप जमदाडे विशाल खरे यांचे सह मान्यवरांनी येऊन पाठिंबा दर्शवला
शहरात गेल्या अनेक महिन्यापासून घरकुल हफ्त्याची रक्कम पडलेली नसल्याने अनेकांनी वर्षभरापासून उघड्यावर प्लास्टिक टाकून आपला उदरनिर्वाह करत आहेत वाळू विक्री सुरू झाल्याने तात्काळ घरकुलाचे बांधकाम करणे गरजेचे असल्याने वाळू व इतर साहित्य साठी रक्कम अत्यावश्यक आहे त्यामुळे घरकुल हफ्त्याची रक्कम तात्काळ टाकावी अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा आकाश कांबळे यांनी दिला होता परंतु रक्कम टाकण्यात न आल्यामुळे त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले असून दुसऱ्या दिवशी तोडगा निघाला नसल्याने शहरवासियातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
