प्रतिनिधी – उमरगा – महेश चंद्रकांत पाटील
जसे जसे निवडणुकीची तारीख जवळ येत आहे त्याप्रमाणे गाव खेड्यात कॉर्नर बैठका सभा यांचा झपाटा सुरू झाला आहे. यात गुंजोटी गटात आणि गणात डोअर टू डोअर प्रचारात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे . यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शहाजी भैय्या पाटील व शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समितीचे उमेदवार सौ. स्नेहा जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. स्थानिक मुद्दे रोजगार महिलांचे प्रश्न, गावातील अंतर्गत रस्ते, अंगणवाडी इमारतीच्या समस्या हे प्रमुख मुद्दे घेऊन दोन्ही उमेदवार निर्भीडपणे जनतेला सामोरे जात आहेत आणि जनतेकडून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे शहाजी भैय्यांची ओळख मतदारसंघात आपल्या हक्काचा माणूस आपल्या कामाचा माणूस एका हाकेवर धावून येणारा आपला मित्र भाऊ म्हणून होत आहे याचं विश्वासाचा जोरावर भैय्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शहाजी भैय्या पाटील हे जेकेकुर चे माजी सरपंच आहेत आणि मतदारसंघात तरुणाच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांनी कधीच आपल्या कार्यकाळात जातीपातीचे राजकारण केलं नाही आणि मतदारसंघातील किंवा बाहेरील जो कोणी व्यक्ती त्यांची अडचण घेऊन येईल ती आपली अडचण म्हणून प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याच कामाच्या जोरावर त्यांनी आपला विजय निश्चित आहे असे ठामपणे सांगितले आहे.
