प्रतिनिधी-नाशिक ग्रा.समाधान भावनाथ
दि.1/02/2026आज नाशिक रोड येथील महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची भावपूर्ण शोकसभा संपन्न झाली. ही शोकसभा संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, राज्य उपाध्यक्ष विनोद अहिरे, विभागीय अध्यक्ष तथा दिव्यांग पतसंस्था चेअरमन सतीश लाड, जिल्हा उपाध्यक्ष सोमानाथ भालनोर, जिल्हा सहसचिव प्रदीप महाले, संघटक रंगनाथ मोरे व विशाल ठोके हे मान्यवर उपस्थित होते.
शोकसभेत राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सोमानाथ भालनोर, विनोद अहिरे, प्रदीप महाले व सतीश लाड यांनी स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या लोककल्याणकारी व संवेदनशील कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल ठोके यांनी केले.
या शोकसभेस राज्य संचालक मनोहर नेटावटे, विभागीय उपाध्यक्ष सुरेश कापडणीस, बाळासाहेब नागरे, जयश्रीसंघटना शांताराम वडजे, बापू खैरनार, शुभांगी पगारे, नीता जोशी, सुभाष बर्वे, अनिल करपे, सत्यम पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीवन नश्वर असते, पण लोकहितासाठी केलेले कार्य अमर असते.स्व. अजितदादा पवार यांचे समाजासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
*शिव परमात्मा त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना! शांती!*
*भावपूर्ण श्रद्धांजली!*
*बाळासाहेब सोनवणे सर,*
*राज्य अध्यक्ष,*
*महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटना नाशिक जिल्हा*
