तामसा प्रतिनिधी -बाबाराव काळबांडे
उमरी (ज) येथे जि प उच्च प्राथमिक शाळेत सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीं सोनबा लक्ष्मीबाई कामाजीराव दवणे हे प्रदिर्ध सेवेतून नियत वयोमानानुयार दि 31/01/2026 शनिवार रोजी सेवानिवृत झाले.
श्री दवणे सरांनी शिक्षक म्हणून शाळेसाठीं 15/09/1990 पासून 31/01/2026 पर्यंत 35 वर्ष 7 महिने शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून खुप मोलाचे योगदान दिले.त्यांनी उमरी जहागीर या शाळेत 2006 ते 2008 या कालावधीत सहशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यानंतर 25 जानेवारी 2026 जवळ जवळ बारा वर्षानंतर जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून आले. सर्व शिक्षकाच्या सहकार्याने अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय उमरी जहागीर यांच्या मदतीने तसेच शिक्षण प्रेमी नागरिक उमरी जहागीर सर्वांच्या सहकार्यांने उमरी जहागीर शाळेत विविध उपक्रम राबवले. स्वातंत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव, तसेच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान अमृत महोत्सव अमृत महोत्सव आणि 9 मार्च 1949रोजी उमरी जहागीर शाळेचा स्थापना दिवस असल्याने शाळा स्थापनेचा अमृत महोत्सव असे उत्सव साजरे केले., भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळेला भव्य असे इमारत बांधकाम आले या योजनेतून बांधकाम लवकर पूर्ण करण्याचा आग्रह धरला. शाळेला पूर्वी असे हिंदू मुस्लिम इमारत प्रयोगशाळा, ICT LAB, आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रयोग शाळा, असो की मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळा सन 2023/24 या वर्षी सर्वांच्या सहकार्यांने हदगाव तालुक्यातून आदर्श शाळेचा प्रथम क्रमांक मिळवला व तीन लाखाचे बक्षीस मिळाले.शाळा व्यवस्थापन समिती उमरी जहागीर यांच्या ठरावानुसार या निधीतून शाळेला सौर ऊर्जा प्लांट घेऊन शाळा वीज बिल मुक्त करण्याचा व, कॅशिओ, तबला संगीत संच साहित्य घेऊन शाळा संगीतमय करण्याचा प्रयत्न करण्यात आला.आदर्श शाळा शाळेचे हे आदर्श व्यक्तिमत्वश्री सोनबा कामाजीराव दवणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सेवा निवृत्त होत असल्यामुळे त्यांचे शाळे वरचे एकनिष्ठ प्रेम पाहून त्यांना शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत कार्यालय, व समस्त गावकरी उमरी जहागीर यांच्या वतीने सरांचे आई वडील सौ लक्ष्मीबाई कामाजीराव दवणे यांना आणि सौ अरुणाबाई सोनबाराराव दवणे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भावपूर्ण असा निरोप देण्यात आला.
या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष श्री आनंदराव बाबुराव गुडमुडके हे होते. या सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहूणे मा. श्री रमेश अण्णा घंटलवार ( माजी जि प सदस्य ) मा.सौ. संध्याताई सदाशिवराव अम्रते ( सरपंच उमरी ज )
मा.गजेंद्र शिंदे साहेब (माजी उपायुक्त).मा.देवराव कदम साहेब, (माजी प्राचार्य) मा. श्री सदाशिव अम्रते ( ग्रा . प . सदस्य )
श्री आनंदराव कावळे ( पोलीस पाटील ) मा श्री रावसाहेब शिंदे ( तंटा मुक्ती आध्यक्ष ) मा. सौ सविताबाई बाबाराव काळबांडे ( शा. व्या. समिती उपाध्यक्ष ) मा श्री प्रशांत कावळे ( ग्रा . प सदस्य )मा श्री लक्षण भवरे ( शा . व्या समीती सदस्य ) मा .सौ रंजनाबाई पुंडलिक खानजोडे सदस्य, मा.सौ वर्षाताई अमोलराव अमृते सदस्य श्री मा . श्री गजानन शिंदे( ग्रा . प . सदस्य ) मा श्री भिम शाहीर अरुण कदम. मा . श्री रघुनाथ . सदावर्ते (तलाठी ) मा. सेवा सहकारी सोसायटी चे संचालक श्री दुलबाजी कदम.श्री शंकररावजी अमृते, (ज्येष्ठ मार्गदर्शक) मा.प्रमोद कदम ( सामाजीक कार्यकर्ते) मा.श्री गौतम कदम ( पत्रकार)
मा . श्री शिवाजीराव खुणे ( पत्रकार )
केंद्रप्रमुख श्री सुनील मोरे सर, केंद्रप्रमुख श्री बास्टेवाड सर (तामसा) केंद्रीय मुख्याध्यापक श्री टिब्बे सर तसेच पाथरड संकुल मधील आणि उमरी जहागीर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.
श्री दवणे सर यांच्या बद्दल अनेक जणांनी मनोगत व्यक्त केले. दवणे सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. आणि शेवटी भावपूर्ण वातावरणात श्री दवणे सर यांना निरोप देण्यात आला.
