जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
जेजुरी पुरंदर : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी तीर्थक्षेत्रात शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास अज्ञात यात्रेकरू गुंडांनी धुडगूस घालत पेढे विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून पेढे विक्रेता आणि सदर युवकांच्यात देण्याघेण्यावरून महिलेशी बाचाबाची झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जेजुरीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार जेजुरी गड परिसरात पेढे विक्री करणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याकडे काही अज्ञात व्यक्तींनी वाद घातला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संबंधित विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण करण्यात आली यात भंडारा विक्रीच्या दुकानाचे नुकसान झाले अलीकडच्या काळात मजा हजा आणि दादागिरी करणाऱ्या लोकांनी आशा तीर्थक्षेत्र ठिकाणी चांगलाच धिंगाणा घातला आहे पेढे विक्रेता मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाविक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी घटनास्थळी जाऊन पेढे विक्रेत्याला चौकशीकरिता ताब्यात घेतले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, दरवर्षी लाखो भाविक जेजुरीत दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवावा, सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवावेत तसेच महाद्वार परिसरात जागेची क्षमता कमी असून वाढत्या गर्दीवर आणि स्थानिक परस्तिथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, देवसंस्थांना स्थानिक व्यपारीवर्ग हतबल असल्याचे चित्र स्पष्ठ होतंय असामाजिक तत्वांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
