दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आ व खा डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेब, यांच्या शतकोत्सवी वर्षा निमित्य 30 व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल समिती नांदेड,बहुउद्देशीय इंडोओर हॉल नांदेड येथे करण्यात आले या स्पर्धेमध्ये 29 जिल्ह्याचे एकूण 410 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.या तलवारबाजीचे उद्घाटक प्रा.डाॅ पुरुषोत्तम केशवराव धोंडगे तसेच मा श्री अशोकजी इंधारे साहेब(छत्रपती पुरस्कार प्राप्त), मा डॉ विठ्ठलसिंह परीहार साहेब (क्रीडा संचालक स्वा.रा.ती.विद्यापीठ),मा दिव्यांत सोनाळे साहेब (नगरसेवक,म.न.पा.नांदेड),मा उदय डोंगरे साहेब( सचिव महाराष्ट्र केसिंग असो),मा जे.ई गोपिले सर, मा राजेश्वर मारावार साहेब(जिल्हा क्रीडा अधिकारी), श्रीमती शिवकांताताई देशमुख(स्पर्धा निरक्षक), गोपीचंद भाऊ जाधव, स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम भाऊंनी डॉ.राहुलजी वाघमारे व त्यांच्या सर्व टीमने राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
