दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
ता. कोरेगांव पिंपोडे बुद्रुक येथे राजमुद्रा महिला प्रभाग संघ वार्षिंक अहवाल सन २०२१-२०२२ प्रभागसंघ राजमुद्रा माहिला कार्यकारणी समिती बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमासांठी प्रमुख पाहुवणे कृषी सभापती माननीय. मंगेश धुमाळ दादा, मा. संजय निकम ( जिल्हा व्यवस्थापक ) मा. संदीप कांबळे सर ( प्रभाग संघ समन्वय )सौ. रुपाली राजेंद्र धुमाळ (अध्यक्ष) सौ. निर्मला दत्तात्रय रासकर ,सौ. स्वाती मोरे मॅडम ,श्रीमती सोनाली धर्माधिकारी, सौ मनीषा विनायक धुमाळ, (कोषाध्यक्ष राजमुद्रा प्रभाग संघ) सौ.सुषमा पुरीगोसावी माजी सरपंच, चौधरवाडी, सौ.वैशाली राजेंद्र धुमाळ उपसरपंच करंजखोप,सौ.वैशाली उमेश धुमाळ ग्रामपंचायत सदस्या करंजखोप, व्यवस्थापक,राजमाता ग्रामसंघ करंजखोप, सौ.वनिता कांबळे राही सामाजिक संस्था मुंबई, ब उत्तर कोरेगांव भागातील सर्व बचत गटांतील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्या आदी महिलांची या कार्यक्रमासांठी आपली उपस्थिंती होती. यावेळी कृषी सभापती सन्माननीय मंगेश दादा धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते बोलताना म्हणाले आज कालच्या युगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिला दिसून येत आहेत. महिलाचे कार्य नेहमीच कर्तव्यदक्ष ठरत असते. पोलीस,बस कंडक्टर, बँकेमध्ये, शाळेमध्ये,अशा विविध क्षेत्रांमध्ये आपणा सर्वांना महिलाराज दिसून येते. त्यामुळे कुटुंबाची व बाहेरील समाजाचीही जबाबदारी महिलांवर आहे. यांच्यासह काही बचत गटांच्या महिलांनी आपले मनोगत व काही महिलांनी गीतातून संदेश दिला. या कार्यक्रमा प्रसंगी काही बचत गटाच्या महिलांनी आपले स्टॉल लावले होते. यावेळी मान्यवर मंडळींनी स्टॉलची पाहणी केली. यामध्ये नवदृष्टी महिला ग्राम संघ आसनगांव, भैरवनाथ महिला ग्रामसंघ वाघोली, राजमाता महिला ग्रामसंघ करंजखोप, संचिता महिला समूह ग्रामसंघ करंजखोप. उत्कृंष्ट महिला ग्रामसंघ करंजखोप, ज्योतिर्लिंग महिला ग्राम संघ राऊतवाडी, नारीशक्ती ग्रामसंघ सर्कलवाडी, स्वाभिमान ग्रामसंघ दहिगांव, मैत्री महिला ग्रामसंघ पिंपोडे बु, सावित्रीबाई फुले ग्रामसंघ नांदवळ, शिवशंभो ग्रामसंघ पिंपोडे खुर्द, राजमाता जिजाऊ ग्रामसंघ घिगेवाडी, कमलादेवी ग्रामसंघ चौधरवाडी, आदी महिला बचत गटांच्या सदस्या व महिला बहुसंख्येने उपस्थिंतीत होत्या. यावेळी राजमुद्रा महिला प्रभाग संघाच्यावतीने प्रमुख पाहुवणे कृषी सभापती माननीय. मंगेश धुमाळ दादा यांचे स्वागत करण्यांत आले, यांच्यासह अन्य मान्यवर मंडळींचे भव्य स्वागत करण्यांत आले तसेच राजमुद्रांच्या वार्षिक बचत गटांच्या कार्यक्रमाप्रसंगी आपला अनमोल वेळ खर्च करुन उपस्थितीत असणारे सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांचे स्वागत करण्यांत आले.
