दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-राज्यसभा निवडून 2022 मध्ये भारतीय जनता पार्टीने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्याचा भूम येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी फटाके वाजवून विजयाची घोषणाबाजी करत आनंद साजरा केला .
राज्यसभेच्या ६ सदस्य पदाच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली . त्याची मतमोजणी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली . यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन सदस्य डॉक्टर अनिल बोंडे .. पियुष गोयल व धनंजय महाडिक या तिघांचाही विजय झालेला आहे .
शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी या विजयाचा आनंद उत्सव भूम येथे पक्ष पदाधिकाऱ्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला . यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम आगे बढो . हम तुम्हारे साथ है . माजी मुख्यमंत्री फडवणीस साहेब तुम आगे बढो . हम तुम्हारे साथ है . आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब तुम आगे बढो . हम तुम्हारे साथ है . आमदार राणा दादा तुम आगे बढो . हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता .
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, माजी नगराध्यक्ष संभाजी साठे . तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर . भूम शहराध्यक्ष शंकर खामकर, तालुका उद्योग आघाडी अध्यक्ष रमेश बापू बागडे . शहर सरचिटणीस हेमंत देशमुख . शहर उपाध्यक्ष अमोल लोंढे . युवा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कुटे . शहराध्यक्ष सुजित वेदपाठक , शहर कोषाध्यक्ष संजय गायकवाड , शहर युवा सरचिटणीस सचिन मस्के . माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ . शहर चिटणीस सचिन बारगजे , तालुका चिटणीस बाळासाहेब विर. मुरलीधर गोरख मंडलीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
