दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परभणी (प्रतिनिधी) : नुकताच लागलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात परभणी येथील विद्यार्थी आदित्य पंडितराव मोहिते यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
परभणी येथील नामांकित उद्योगपती तथा लोखंड, सिमेंटचे व्यापारी पंडितराव मोहिते -पाटील यांचे चिरंजीव आदित्य मोहिते यांनी ९२.५० टक्के गुण मिळविले आहेत. त्याने शालांत परिक्षेतही असेच घवघवीत यश प्राप्त केले होते. सधन, उद्योग व्यवसायात अग्रेसर असलेल्या वडिलांना शिक्षणाबरोबरच धंद्यातही हातभार लावून अभ्यासाची चिकाटी कायम ठेवली. भविष्यात कांही तरी विशेष असं करुन दाखवण्याची जिद्द असल्याचेही आदित्य याने बोलून दाखवले. श्रीमंतीत वाढलेल्या मुलांना अभ्यासाचा आळस व मोठेपणाचा कळस अशा वृत्तीने मिरविण्याची सवय असते असं म्हणणा-यांचे म्हणणेही आदित्य याने पूर्णतः खोडून काढत मिळविलेल्या घवघवीत यशातून दाखवून दिले आहे. आदित्यच्या या भरीव यशाचे परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक व हितचिंतक आणि परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या भरीव यशाचे श्रेय आदित्य याने परभणी येथील संत तुकाराम उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, अन्य गुरुजन, आई-वडील व परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांना दिले आहे.
