दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
गावाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचे तालुक्याभरात स्वागत
लोहा – आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक असलेले व लोहा तालुक्यातील सर्वाच्या परीचयाचे असणारे सामाजिक कार्यात सतत भाग घेणारे सर्वांच्या मनावर आपल्या हसऱ्या व शांत स्वभावाने प्रतिबिंब निर्माण करणारे ज्ञानोबा पाटील गाडेकर यांची तंटामुक्त समिती धावरीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
धावरी येथे बुधवारी सकाळी ११:०० वा सार्वजनिक सभागृहात गावातील सर्व नागरीकांची ग्रामसभा भरवण्यात आली यावेळी आप आपसातील राजकीय मतभेद बाजूला सारून गावच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन ग्रामसभेत गावांमध्ये शांतता नांदावी , भांडण तंटे होऊ नये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड बिनविरोध व मतदानाद्वारे केली जाते. याविषयीची माहिती ग्रामसेवक कानवटे यांनी दिली. तर यावर्षी गावातील ग्रामस्थांनी एकञ तंटामुक्ती अध्यक्ष या पदासाठी कसल्याच प्रकारची रसीखेच वादविवाद न करता धावरीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानोबा पा गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच माणिकराव वाकडे , उपसरपंच अशोक गिते ग्रामसेवक कानवटे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रहार वाडे चेअरमन शंकरराव काळे , माजी चेअरमन पंडीत पा गाडेकर , भाजपा तालुकाउपाध्यक्ष अभंग पा गाडेकर , दिलीप पा गाडेकर माजी पंचायत सिताराम पा गाडेकर समिती सदस्य , माजी सरपंच गोविंदराव वाकडे , बाबाराव गाडेकर शालेय समिती अध्यक्ष राजु पा वाकडे , शिवाजी पा वाकडे , देवराव वाकडे , माजी शालेय समिती अध्यक्ष रूक्माजी पवार , शंकर पवार, मनोहर गाडेकर , मनोहर वाकडे , , विनायक गाडेकर , बाळाजी वाकडे , भगवान गाडेकर , कामाजी काळे , विकास गाडेकर शिवमुद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नंदाजी पा इंगळे व गावकरी मंडळीची प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानोबा पा गाडेकर सामाजिक कार्यातही ते नेहमीच पुढे असतात. चांगल्या व्यक्तिमत्त्वाची तंटामुक्त समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यापुढे सर्व समान्य व्यक्तींना न्याय मिळावा गावातील तंटे वादविवाद गावातच मिटावे , व गावात कायम शांतता नादावी असे यावेळी मत व्यक्त करण्यात आले व ज्ञानोबा पा गाडेकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
