दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : बालविवाह रोखणे ही काळाची गरज असून त्यासाठी पोलिस दलानेच प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी आज आढावा बैठकीत दिले.
परभणी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या रुपाली ताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार, दि. एक ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनामधील आढावा बैठकीत सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मोहम्मद खान, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, जि.प.महिला व बालविकास अधिकारी विलास जाधव आदीजन उपस्थित होते. दोन दिवसीय दौरा आटोपून त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांच्या दालनात आढावा बैठक
घेतली त्यावेळी चाकणकर यांनी असेही सांगितले की, बालविवाह ही सामाजिक समस्या असून ती येणकेन प्रकारे रोखली जावी ही काळाची गरज आहे. मुलींचा पूर्णपणे विकास न होताच त्यांच्यावर ती जबाबदारी कांही कारणास्तव लादली जाते. तेव्हा पोलिस दलानेच यावर प्रभावीपणे उपाययोजना करणे गरजेची असल्याचे निर्देश चाकणकर यांनी यावेळी दिले.
राज्यात सत्तांतर झाले असून मागील कांहीं दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेले बरेचसे निर्णय रद्द करुन शासनस्तरावरील कार्यरत पदाधिकारी व सदस्यांनाही दूर करण्यावर भर दिला आहे. असं असलं तरी रुपालीताई चाकणकर यांनी मात्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतली तेव्हापासूनच योग्य अशा कामांचा सपाटा व निपटारा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या परभणी जिल्ह्याच्या दोन दिशसीय दौऱ्यावर आल्याचे समजते. यावेळी रुपालताई चाकणकर यांनी निर्भया दलाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान केला.
