दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा
निमित्ताने एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन यांनी राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या दिव्यांग अस्मिता अभियानअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र करिता तपासणी व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.अमित शेडगे साहेब (प्रांताधिकारी), मा.श्री.सचिन गोसावी साहेब(तहसीलदार), श्री.गौतम देसाई(श्रीवर्धन वैद्यकीय अधिक्षक), सौ.प्रतिमा फडतरे(अलिबाग वैद्यकीय अधिक्षक) डॉ.शुभम शेळके, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष समीर रिसबूड आणि सहकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. एकूण १४६ दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करून मिळाले. यामुळे जिल्ह्याठिकाणी जाण्यासाठी होणार त्रास दिव्यांगांचा कमी झाला आहे. ॲड.संतोष सापटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या शिबिरासाठी कुणबी युवा संघटनेचे राजा टाकले आणि सहकारी यांचे मोलाचे योगदान मिळाले. आता पर्यंत हा दुसरा प्रमाणपत्राकरिता शिबिर राबविण्यात आला. त्यामुळे अनेक दिव्यांगांचे प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लागला असे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश बारक्या नाक्ती यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाअंती संघटनेचे उपाध्यक्ष मुईद सरखोत, भरत पवार, कार्याध्यक्ष नवाब कुदरते, उपसचिव संतोष शेडगे, सल्लागार संतोष पारधी, सदस्य सुनील गायकर, प्रियांका कासार यांनी दिव्यांग व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
