दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार -बाजीराव गायकवाड
नांदेड:- नुकत्याच पार पडलेल्या इंडियन चेस्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये डॉ चंद्रकांत टरके यांनी भरघोस मतांनी विजय मिळावला आहे. इंडियन चेस्ट सोसायटी ही भारतातील चेस्ट फिजिशियन्स ची सर्वात मोठी संस्था आहे. या निवडणुकीत संपूर्ण भारतातील चेस्ट फिजिशिअन्स आणि पलमोनोलॉजिस्ट यांनी भाग घेतला होता. सर्वात कमी वयात या पदावर निवड होणारे डॉ टरके हे भारतातील पहिले डॉक्टर आहेत. डॉ टरके हे मूळचे किवळा, नांदेड येथील असून सध्या अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे सिनियर कन्सलटंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातुन कौतुक होत आहे.
