दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर प्रतिनिधी दि :- अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिन, सम्राट अशोक विजयादशमी निमित्त जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान *गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेचे पूजन मार्गदर्शक माधव सरवदे, बळीराम मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक सरवदे यांच्या शुभहस्ते करुन अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी ग्रामपंचायत बांधकाम सभापती विक्रम भोसले, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे, युथ पँथर सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष भगवान कांबळे, पँथर नेते शिवाजी सरवदे,दिलीप कांबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव धर्मपाल सरवदे, सहसचिव मारुती सरवदे, अंशुल सरवदे, अशोक वाघमारे, शिवाजी बनसोडे, राजेश सरवदे यांच्यासह रमामाता महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.
ह्यावेळी इंजिनिअर विकास कांबळे यांनी चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे आभार बुद्धभूषण मोरे यांनी मानले.
