दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांची शांत संयमी व विकासमुख नेतृत्व म्हणून जिल्ह्यात ओळख होती असे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांच्या अभिवादन सभेत केले .
लोहा -कंधार पंचायत समितीचे माजी सभापती कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे अभिवादन सभा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या तथा जि. प. सदस्या सौ प्रणिताताई देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकादम,भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकादम, नगरसेवक केशवराव मुकादम , नगरसेविका कल्पना ताई मुकादम , नारायण मुकादम,सचिन मुकादम, डॉ. दिनेश मुकादम,बिपिन मुकडंम सतीश मुकादम माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, गटनेते करीम शेख,माजी सभापती शंकर पाटील ढगे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, मनोहर भोसीकर, नारायण पवार, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. जवळगेकर, डॉ. राजेश पवार, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ प्रशांत जाधव, मित्रत्व ग्रुप चे अध्यक्ष अविनाश पाटील पवार, शिव संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिपक पाटील कानवटे, माजी उपसभापती बळीराम पाटील जानापुरीकर, सरपंच उध्दव पाटील सुर्यवंशी ,भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन राठोड, नगरसेवक अरुण येळगे, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण धनंजय पवार, दिनेश तेललवार , संजय मक्तेदार, डॉ. डी. बी. कानवटे, बाबु केंद्रे , राम पाटील सायाळकर, पोलीस पाटील रोहिदास पाटील जाधव ,नामदेव कटकमवार, माधव पाटील पारडीकर, पंकज मोटरवार, नागेश दमकोंडवार,माधव सुर्यवंशी, पवन तेललवार, व्यंकट जंगले ,आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. कै. मुकादम साहेबांनी जे विकास कामे केलेत ते आतापर्यंत कुणीही केले नाहीत असे लोक सांगतात .
कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांच्या पुण्याईमुळे जिजाबाई मुकादम या नगराध्यक्षा झाल्या , त्यांचे पुत्र केशवराव मुकदम हे उपनगराध्यक्ष झाले, कल्पना ताई मुकादम या नगरसेविका झाल्या . माणिकराव मुकादम हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.मुकादम घराणे हे राजकारणात लोहा शहरात अग्रेसर आहे असे खा. चिखलीकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना खा. चिखलीकर म्हणाले की, केंद्राने महाराष्ट्राला महावितरण साठी २९ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यात नांदेड जिल्ह्याला १ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.तसेच नांदेड जिल्ह्यासाठी केंद्राने गॅस पाइपलाइन मंजूर केली आहे. राज्यातील व देशातील सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे आहे. ना. देवेंद्र फडणवीस शिवाय राज्याला पर्याय नाही. नांदेड जिल्हा हा भाजपाच्या पाठीशी आहे.
किरण वटटमवार त्यांच्या भाषणात म्हणाले की, माझे लोहयावरचे लक्ष कमी झाले आहे तसे अजिबात नाही. माझे लोहयावरील लक्ष अजिबात कमी झाले नाही लोहयात बायपास टू बायपास रोड होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे, बौध्द विहार होणार आहे, मुस्लिम शादीखाना होणार आहे. लोहा शहरातील सर्व रस्ते होणार आहेत.
अशोकराव चव्हाण यांनी भाजपला माझ्या पक्षाला विधिमंडळात मदत केली मी त्यांचे आभार मानतो .कै. व्यंकटराव मुकादम साहेब यांचे कार्य अतिशय चांगले होते त्यांनी सर्वांना मदत केली त्यांनी कधी कुणाचे वाईट केले नाही त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले .
तसेच यावेळी कै व्यंकटराव मुकादम साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवछत्रपती प्रा. व माध्यमिक , डॉ. याकूब खान उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिज्ञासा अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षाचे १० हजार रुपयांचे पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला लोहा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर , व्यापारी, नागरिक, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव मुकादम यांनी केले तर सुत्रसंचलन विक्रम कदम यांनी केले.तर आभार सचिन मुकादम यांनी मानले.
