दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर( दि.०७) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपुरवठा विहिरीच्या कामाचा भूमीपूजन सोहळा वझरचे सरपंच आदरणीय श्री नंदकुमार पळणीटकर पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
श्री माधव मरिबा गायकवाड यांनी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी आपली जमीन देऊ करून उदारपणाचा आदर्श निर्माण केला.त्याबद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर श्री गायकवाड साहेब,श्री देशमुख उचेकर,श्री मुस्तफा,कॉन्ट्रॅक्टर नाईकसाहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच श्री नंदकुमार पळणीटकर पाटील,उपसरपंच श्री नरसिंग गुरुजी चोरमल्ले,सदस्य भिवाजी लवटे,श्रीराम चोरमल्ले,विजय पाटील, सुनील सोनकांबळे,अँड.संकेत पाटील,शरद कणजे,ज्येष्ठ नागरिक हैबतराव रुपनर,रमेश शेंडगे,ज्ञानेश्वर डावरगावे,हणमंत शिंदे,चाँद शेख आदी उपस्थित होते .
