दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : शहरात मागील काही दिवसांपासून विशेषतः दिवाळी सणाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. खेदाची बाब म्हणजे नारायण चाळीतील एका मोबाईल शॉपीचे दुकान फोडून तब्बल करोडोंचे मोबाईल चोरीला गेले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय काही ज्वेलर्स ची व अन्य काही दुकाने फोडून चोरांनी शहरात हैदोस घातला आहे परिणामी सर्व व्यापारी वर्गात दहशत व भिंतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व चोरीच्या घटनांविरोधात आज परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदने देऊन संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.
दैनिक चालू वार्ता तर्फे कालच एका वृत्तांकनाद्वारे पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. परभणी शहर व जिल्हा स्तरांवर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या चोऱ्या, घरफोड्या, दुकाने फोडीचे प्रकारामुळे व्यापारी वर्ग पूरता धास्तावला गेल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले आहे. वाढत्या गुन्हेगारीचा रेषो पहाता गुन्हेगारीने येथे मोठ्या प्रमाणांत डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. वेळीच या घटनांवर आवर घालणे गरजेचे असून या गुन्हेगारांचे व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक ठरणारे आहे.
शहरात व परिसरात मागील काही दिवसांपासून खूनाच्या व जबरी चोरीच्याही घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय अफवांवर हमले करुन दिवसाढवळ्या होणारी लूट म्हणजे महिला स्वातंत्र्यावरचा घाला असल्याचे बोलले जाऊ शकतो. देवी-देवतांची मंदीरे खुलेआम लुटली जात आहेत. गर्दुल्यांचा सुळसुळाट गल्ली बोळात व शहरात सर्वत्र झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. या व अशा अनेक घटना जीव घेण्या ठरल्या जात आहेत.
पोलीसही जीवापाड मेहनत करीत आहेत, यात तीळमात्र शंकाच नाही परंतु वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जेवढे पोलीस बळ आवश्यक आहे, ते कदाचित नसावे, नव्हे ते किती तरी पटीने कमी संख्येतही असू शकेल त्यामुळेच कर्तव्यावरील पोलिसांवरती त्याचा त्राण पडला जाऊ शकतो यातही शंका नसावी तर मग नागरिक, व्यापारी, उद्योजक या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांशिवाय अन्य कोणावर असू शकेल हा खरा सवाल उरतो, त्याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक नाही का ? हां, राहाता राहिला तो प्रश्न म्हणजे पुरेसे संख्याबळ उपलब्ध नसल्याने जागोजागी किंवा म्हणाल तेथे सुरक्षा पुरविणे हे सुध्दा तात्विक दृष्ट्या शक्य होणारे नसते. त्यासाठी पोलीस, व्यापारी व नागरिक यांच्या समन्वयातून सुरक्षा गस्ती पथके निर्माण करुन ती रात्रीच्या गस्तीवर तैनात केली गेली तर मोठ्या प्रमाणात सुरक्षा उपलब्ध होऊ शकेल शिवाय त्याचा कोणावरही भार पडू शकणार नाही, हे सुध्दा तितकेच खरे आहे. गस्ती पथकात सामील सर्व व्हॉलिंयटर्सना पोलीस खात्यातर्फे रितसर ओळखपत्र देऊन तसा गणवेश, काठी व टोपी असा गणवेश ही परिधान केल्यास त्यांचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढू शकेल एवढे नक्की. तथापि पोलिसांचीही त्यात मजबूरी असल्याने केवळ त्यांनाच दोष देणे कितपत संयुक्तिक ठरु शकेल यांचाही विचार होणे गरजेचे नाही का ?
पोलीस अधीक्षक सुधाराग आर. यांनीही अधिक पोलीस दल व सुरक्षा बलाची मागणी करुन वरिष्ठांना याबाबतीत साकडे घालणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना अशा प्रसंगांचा उठसुठ सामना करावाच लागतो, यात तसे नाविण्य काहीच नाही. प्रसंगी स्थानिक राजकीय मंडळी अर्थात आमदार, खासदार यांचीही मदत घेऊन या वाढीव दल व बला विषयीची मागणीचे सहकार्य घ्यावे लागले तरी चालेल जेणेकरुन शहर व जिल्हा स्तरावरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जाईल. असे झाले तर सोने पे सुहाना असे म्हटले तर वावगे ठरू नये.
