दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे भगत व बाळे डीपी वरील शेती पंपाचे ग्राहक जास्त प्रमाणात वाढल्याने सध्या स्थितीतील असलेल्या डीपीवर मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असल्याने डीपी वर लोड वाढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पंपाला योग्य तो विजेचा पुरवठा होत नसल्याने ट्रांसफार्मर वारंवार फस्त होत आहे.त्या कारणास्तव शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून स्थानिक सर्व शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेत निवेदन देऊन नवीन डीपी बसवण्याची मागणी केली आहे.तसेच जर आठ दिवसात नवीन डीपी बसविल्या गेली नाही तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंजनगाव सुर्जी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.
डीपी लवकरात लवकर दुरस्त करून देण्यात येईल आणि वेगळी डीपी देण्यासाठी आपल्याला नवीन अर्ज करावा लागेल.त्यासाठी डीपीडीसी फंड साठीची जोपर्यंत कागदोपत्री प्रक्रिया होत नाही तोपर्यंत नवीन वेगळी डीपी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नाही.या सर्व गोष्टीसाठी ५ ते ६ महिन्याचा कालावधी लागू शकतो. – नंदनवंशी उपकार्यकारी अभियंता,अंजनगाव सुर्जी
