दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर(प्रतिनिधी)आज दि.6 डिसेंबर प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगांवकर दमन होते.या कार्यक्रमास लाभलेले वक्ते वाघमारे वसंतराव होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली.यानंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचा परिचय सुरशेटवार यांनी करून दिला. बुद्धवंदना कु.माथुरे, कु.वाघमारे हिने सादर केले तर पद्य तोटावार यांनी सादर केले.
यानंतर वक्त्याच्या भाषणाला सुरुवात झाली.त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे प्रश्न विचारून बोलते केले.बाबासाहेबांचे अनेक किस्से, त्यांनी केलेले कार्य याची माहिती सांगीतली. शनिवारचा हाफ डे रविवारची सुट्टी ,महिला आरक्षण, मतदानाचा हक्क, OBC आरक्षण, संविधान या अनेक बाबी बाबासाहेबांनी समाजाला दिल्या.त्यांची अभ्यासाची जिद्द याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोप देगावकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची दिनचर्या ठरवून अभ्यास करण्यास सांगीतले . कार्यक्रमाच्या शेवटी अश्विनी कदम यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा पांचारे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
