दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दि 8जानेवारी 2023 रोजी हाॅटेल दर्यासारंग, गणपतीपुळे येथे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संजय पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची ओळख करून दिली तसेच आपली संस्था विविध क्षेत्रात कार्यरत आहे तसेच संपूर्ण देशपातळीवर संस्थेचे कार्य चालू आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेमार्फत गौरव करण्यात येतो.आज प्रामुख्याने महिलांना प्रथम संधी देण्यात आली.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक मा श्री किसनराव कु-हाडे,सौ क्रांती कु-हाडे,वाडीया काॅलेज पुणे उपप्राचार्य मा श्री प्रकाश चौधरी, उद्योजक श्री सुनील नारकर, श्री संजय केळवणकर हे होते. या सर्व मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.व आविष्कार फाउंडेशनचे कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजिप शाळा गोंडघर उर्दू शाळेचे श्री नदिमोद्दिन सय्यद रोहीणी शाळेचे पदवीधर विषय शिक्षक श्री भानुदास राठोड,व उपशिक्षक श्री शिवाजी चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या 97 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्कार मूर्ती पैकी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना संस्थेला धन्यवाद दिले.
यावेळी आविष्कार फाउंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संदीप नागे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संदीप परटवलकर ,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते,, म्हसळा तालुका सचिव श्री रमेश जाधव, अब्बास शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
