दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
राज्यात शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वंचीत बहुजन आघाडीची युती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचीत बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केल्यामुळे
लोहा शहरात शिवसेना (ठाकरे) व वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोहा येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात एकत्र येऊन लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जल्लोष केला.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कराळे, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा -कंधार संघटक गणेश कुंटेवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर , बाळासाहेब जाधव सुनेगावकर , युवा सेनेचे बालाजी गाडेकर पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण ,वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आणेराव , युवा नेते धिरज भैय्या हाके शिवसेनाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा शहरप्रमुख गजानन कराडे (गुंठे), युवासेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष बालाजी गाडेकर, वंचीत बहुजन आघाडीचे लोहा तालुका सोशल मिडिया प्रमुख सिध्दार्थ ससाणे, छगन हाटकर, यांच्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
