दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुध व्यवसायाकडे वळले आहेत. तालुक्यात विविध कंपन्यांच्या डेअरीकडून दुधाचे संकलन केले जात असल्याने शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे येवू लागले आहेत. परंतू आता उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचे भाव वधारल्याने पशूपालकांचे गणित बिघडले आहेत.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून दुध व्यवसायाकडे वळले आहेत. संकरीत गायीसह म्हशीचे संगोपन करून दुधाचा व्यवसाय करीत आहेत. दुधाच्या फॅटनुसार व डीग्रीनुसार दुधाची किंमत ठरविलीजाते. दुधाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. मात्र हिरवा चारा मिळत नसल्यामुळे गाई, म्हशीने दुध देणे कमी केले आहे. गाई, म्हशींना उन्हाळ्यात सुके वैरण स्वायाबीनचे , तुरीचे भुस , गव्हाचा गव्हांडा यावर भागवावे लागते. शिवाय जंगल किमी झाल्याने उन्हाळ्यात चारा मिळत नसल्याने वैरणासाठी गुराख्यांना भटकंती करावी लागते. तालुक्यातून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने कडबा मिळणे कठीण झाले आहे. एकीकडे हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे तर दुसरीकडे सरकी ढेप, शेंगदाणा ढेप,इतर चऱ्याचेही भाव वधारले आहे. काही शेतकऱ्यांनी ओला चारा म्हणून शेतात हिरव्या चाऱ्याची पेरणी केली आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकरी सुक्या वैरणावर पशूधनाची भूक भागवित आहेत.
