दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनीधी –
किनवट तालुका कार्यकरणीची आढावा बैठक व चर्चा
किनवट/प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा युवा अध्यक्ष मा.ना.झेंपलवाड यांनी किनवट येथील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन किनवट तालुका कार्यकारणी व युवा कार्यकारणीतील सभासद पत्रकारांच्या विविध समस्या व सद्यस्थितीतील विषय ( माहिती अधिकार ) व ईतर सामाजिक विषयी संगोपन चर्चा केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत अनुप अनमवार( बँक मॅनेजर नांदेड तथा प्रदेश अध्यक्ष गोल्ला गोल्लेवार यादव कर्मचारी महासंघ ) शिवाजी बोट्टेवाड पत्रकार तथा माजी सरपंच कोसमेट ता.कार्याध्यक्ष )
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने नांदेड जिल्ह्यांतील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे कार्य प्रगतीपथावर सुरू असून नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संघटनेचे कार्य एकजुटीने चालु आहे.
त्यामुळेच संघटनेचा विस्तार वेगाने होत असून संघटन मजबूत होत आहे त्यामागे आपल्या सर्व सभासदांचे परिश्रम आहेत.
समाजातील जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवुन देत असताना अद्भवणाऱ्या अडीअडणींवर मात करण्यासाठी, प्रस्थापितांच्या कोणत्याही धमक्या व दबावास भिक न घालता सत्याची कास धरून वास्तववादी वृत्त प्रकाशित करत लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ बळकट करण्यासाठी संघटनात्मक बळ अत्यंत मोलाचे आहे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अतिशय उत्कृष्ट रीत्या चालु आहे . त्यामुळेच जास्तीत जास्त पत्रकार बांधव प्रेस व संपादक व पत्रकार सेवा संघाला जोडले जात असल्याचे सांगीतले. महाराष्ट्रातील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे सर्व पत्रकार बांधव एकजुटीने कार्य करत आहेतच त्याबरोबरच सातत्याने राबविल्या जाणाऱ्या विविध नाविन्य पुर्ण सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व सत्कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, कार्यकारणी सल्लागार विलास सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, तालुका सदस्य इंद्रपाल कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.
