दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
आज चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अनुसूचित जाती विभागाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आश्विनी खोब्रागडे,प्रदेश सरचिटणीस विनयबोधी डोंगरे व गुणवंत सोनटक्के यांच्या उपस्थितीत पार पडली.
या महत्वपूर्ण बैठकीत चंद्रपुर जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस चंद्रपूर प्रभारी गणेश वानखेडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अनुसूचित जाती विभागाचे प्रफुल खापर्डे , चंद्रपुर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.निशा धोंडगे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
