दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा: होसुर येथील युवकांनी वाढदिवसानिमित्त नवीन उपक्रम राबवत असल्याचं पहायला मिळत आहे. येथील नव्याने सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये तानाजी बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करून एक नवीन उपक्रमास सुरुवात केली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या रकमेतून पर्यावरणास गतिमान करण्याचा उपक्रम या माध्यमातून होईल यासाठी नवतरुण युवकांनी अनपेक्षित खर्च टाळून वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाची आठवण म्हणून वृक्ष लागवड करावी अशी प्रतिक्रिया तानाजी बिरादार यांनी व्यक्त केली. यावेळी गावातील प्रतिष्ठत नागरिक व गावचे उपसरपंच गोविंदराव पाटील व गावचे माजी सरपंच श्रीमंत बिरादार सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्व सदस्य उपस्थित होते.
