दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड (वार्ताहर) –
मुखेड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मंगळवार दि. ११ रोजी करण्यात आले आहे. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
श्री. नागेंद्र मंदिर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित व लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ११ रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात मोतीबिंदू रोग निदान झालेल्या रुग्णाला मोफत नांदेड जाण्यासाठी तसेच रुग्णास शस्त्रक्रिया करण्यासाठी सोय केली जाणार आहे. यावेळी लायन्स क्लब नांदेड चे डॉ. निखल बोईनवाड, वैशाली दगडे, प्रतिक्षा देवसरकर या तज्ञ डॉक्टर मंडळींनी शेकडो रुग्णांची तपासणी केली. मुखेड येथील नेत्रचिकित्सक प्रशांत मांजरमकर यांनी रुग्णाच्या डोळ्याची तपासणी केली. यावेळी नांदेड जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष शंतनु कोडगिरे, मंगेश कोडगिरे, ड. आशिष कुलकर्णी, व्यंकटेश कवटीकवार, बाळानंद गबाळे, पत्रकार शिवकुमार बिरादार, विठ्ठल पाटील येवतीकर,शंकर पांचाळ, गजानन मोरे, भीमराव डावखरे, अडगुलवार बाई, राणी चौधरी आदी सह अनेक जण उपस्थित होते.
