दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कलंबर:- लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथील अनिल मारोती जाधव या विद्यार्थ्यांने मेहनतीने आणि जिद्दीने अभ्यास करून ठाणे जिल्हा पोलीस म्हणून निवड झझाली आहे . त्याने १ली ते १२ पर्यंतचे शिक्षण बळीराम पाटील प्राथमिक शाळा व संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथे शिक्षण घेतले असून तो पहिलीपासून अतिशय हुशार विद्यार्थी होता. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक एस. एन. मामडे साहेब यांनी शाल ,श्रीफळ, हार घालून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शेट्टे सर, प्रा. वाघमारे सर, गायकवाड सर, प्रा. मुंडे सर, प्रा. आगलावे सर, प्रा. वडजे सर,माधवराव घोरबांड, जंगमे सर, ए. कदम, सी. कदम, एस. तेलंग ,श्रीनिवास लोहकरें अनिल घोरबांड, प्रल्हाद घोरबांड,नागेश तुप्पेकर, बालाजी घोरबांड,कराळे सर, गोरे मॅडम, सोळंके मॅडम, सुधाकर इंदुरकर,
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड यांनी अनिल जाधव यांच्या सत्कार करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. शाळेतील विद्यार्थी,भोपाळवाडी येथील गावकऱ्यांनी अनिल जाधव याचे अभिनंदन केले आहे, तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
