दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
लातूर: केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे 22 एप्रिल 2023 पासून दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांचे 22 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता निलंगा येथील आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी आगमन होईल व मुक्काम. 23 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंबुलगा बु. (ता. निलंगा) येथे ओमकार शुगर फॅक्टरी प्रा. लि. च्या युनिट-2 च्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. दुपारी तीन वाजता लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याची पाहणी करतील. त्यानंतर ते जालनाकडे प्रयाण करतील.
