दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा.२१ ता संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर मंठा तालुक्यात सगळीकडे ईद उत्साह पाहायला रात्रभर मिळाला.सगळीकडे ईदचा उत्साह आनंदाने ओसंडून वाहत असताना देशभरात जगभरात एक साजरी जात असताना. रमजान ईद हा अत्यंत पवित्र सण आहे चंद्र दर्शनाची साक्ष मिळाल्याने शनिवारी (ता २२) रमजान ईद मंठा शहर तालुका भरत साजरी करण्यात आली.
माणुसकीचा धागा मजबूत करणारा ‘रमजान’ ईद म्हणून जगभरात ओळखला जातो.
सण कोणत्याही धर्माचा असो तो आनंदाने साजरा करण्याची शिकवण मंठेकर सबंध भारताला देतात हे मंठा शहराच एक वैशिष्ट्य आहे.रमजान ईद निमित्ताने अनेक हिंदू आणि इतर धर्मीय बांधवांच्या शुभेच्छा पर शामियाने ईदगाह परिसरात दिसून येत आपला बांधवांची गळा भेट घेण्याकरिता सर्वच स्तरांमधून ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव मीडिया सोशल मीडिया फेसबुक व्हाट्सअप माध्यमातून दिसत.धर्म कोणताही असो त्यातील प्रत्येक सणाचा संदेश आहे की, माणुसकी, प्रेम सर्वश्रेष्ठ ईदच्या निमित्ताने हा प्रेमाचा माणुसकीचा धागा मजबूत होतानाचे दृश्य मंठा नगरीमध्ये दिसून आले.
मंठा ईदगाह येथे सामूहिक नमाज पठण केल्यानंतर समस्त मुस्लिम बांधवांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे, सुसज्ज पोलीस प्रशासन मंठा, दर्पण मराठी पत्रकार संघाच्या वतीने गळा भेट घेऊन गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मंठा मुख्य मार्गावर गळा भेट घेऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
