दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शहरी व ग्रामीण भागातही लग्न, वाढदिवस, बेबी शॉवर, हॉलिडे डेकोरेशन, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि पार्टी डेकोरेशनच्या इतर अनेक समारंभांसाठी कमी किमतीच्या आणि उच्च दर्जाच्या बलून आर्क डेकोरेशन सेटची मागणी वाढत आहे.
अर्ध्या ते एका तासापूर्वीसुद्धा सजावट करून कार्यक्रम आटोपली जातात. यासाठी सामान्यतः पांच रुपये प्रतिबलून यानुसार पैसे आकारले जातात. बलूनमध्ये हवा भरण्याची मशिन आणि अन्य सजावटीच्या साहित्यासह काही वेळातच घराच्याप्रवेशावर फुग्यांचे शानदार गेट, स्टेजवर सजावट, घराच्या समोर बलूनचे झुंबर, तोरण अशी सजावट करण्यात येते.
यासाठी बलूनच्या आत एकप्रकारचे लिक्विड टाकले जाते, यानंतर हीलियम भरली जाते. रिसेप्शनमध्ये वर-वधूच्या प्रवेशावेळी दोन्ही बाजूला मोठ्या बलूनच्या आत हृदयाच्या आकाराचे अनेक बलून टाकल्या जातात. प्रवेशावेळी मोठा बलून फुटताच आतील हीलियम बलून हवेत उडविले जातात. आता कोरोना निर्बंध संपुष्टात आल्याने लोक धुमधडाक्यात कार्यक्रम आटोपली जात आहे. या कार्यक्रमात आता बलून डेकोरेटर्सला विशेष पसंती दिली जात आहे.
