दैनिक चालु वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा: देवणी तालुक्यातील वलांडी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून आजुबाजुच्या 40 गावातील नागरिक विविध कामांसाठी व आठवडी बाजारासाठी वलांडी येथे येतात. गावातील मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने वलांडी बसस्टॉप ते मुख्य बाजारपेठ रस्त्यांवरील अतीक्रमण काढण्यात येणार असल्याची सुचना ग्रामपंचायत कार्यालयाचा वतीने आतिक्रमण धारकाना नोटीसीद्वावारे देण्यात आली होती. त्यांनी स्वत अतिक्रमण काढले नसल्याने ग्रामपंचायत आधीनियम 1958 कलम 53 आर नुसार ग्रामपंचायतीनी ठराव घेऊन नियमानुसार आतीक्रमण धारकाना तीन नोटीसा पाठऊन त्यांची ग्रामपंचायतीमध्ये सुनावनी घेण्यात आल्याचे व तसा प्रस्ताव वरीष्ठाकडे सादर करून वरीष्ठांचाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी व इतरांच्या मार्फत दोन जेसीबी, चार ट्रक्टर द्वारे अतीक्रमण काढण्यात आले.
यावेळी देवणी तहसीलदार सुरेश घोळवे,गटविकास अधिकारी सोपान अकेले,सरपंच राणीताई भंडारे,उपसरपंच मैहेमुद सौदागर,व सदस्य ग्रामविकास अधिकारी एच एम केंद्रे,पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, वलांडी सज्जाचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे,तलाठी अबरार शेख,पोलीस कर्मचारी वलांडी बीट अमलदार शौकत सय्यद,उदय शेटकर इतर कर्मचारी सरपंच उपसरपंच सदस्य पत्रकार यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
