दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
रमजान ईदच्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवाना भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ईदगाह मैदान येथील नमाज पठण स्थळ येथे जाऊन भाजप तालुकाप्रमुख अजित दादा पिंगळे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाप्रमुख अजित दादा पिंगळे, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला,अभय गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद वाघमारे शहराध्यक्ष गजानन चोंदे, माजी नगरसेवक शकील काजी,इलियास कुरेशी,रफिक सय्यद,तानाजी चव्हाण फरमान सय्यद, इमरान काझी अक्षय सातव आदी उपस्थित होते..
