दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दिनांक 4 मे 2023
तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव येथे महामानव तथागत गौतम बुद्धाच्या 2567 व्या बुद्ध जयंतीचे औचित्य साधून श्रामनेर व अनागारिका (मुलींसाठी ) धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 मे पासून हे शिबिर सुरू झाले असून 11 मे रोजी शिबिराचा समारोप होणार आहे आदर्श धम्माचे संस्कार या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांमध्ये रुजावे म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यातआहे असल्याचे पूज्य भंते महाविरो थेरो काळेगाव यांनी सांगितले आतापर्यंत जवळपास 60 मुलांनी चिवर घेऊन या शिबिरात आपला सहभाग नोंदवला आहे त्याचबरोबर 25 मुली ह्या अनागारिका झाल्या आहेत ज्या अष्टशील व नऊ शिलावर काम करून सदधम्माला समजून घेणार आहेत या शिबिरासाठी मुख्यत्वे भिक्खू शरणंकर थेरो नागपूर विपश्यनाचार्य यांचे मुख्य मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे दररोज पहाटे चार ते रात्री दहापर्यंत मुलांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जाईल व त्यानंतर नवव्या दिवशी मुलांची शंभर मार्काची परीक्षा घेऊन प्रथम द्वितीय व तृतीय असे प्रोत्साहन पर पारितोषक देण्यात येणार आहेत या शिबिरास लातूर नांदेड बीड इत्यादी जिल्ह्यातून मुलं मुली आली असून मोठ्या प्रमाणात मुलांचा प्रतिसाद मिळत आहे
