देशातील दिसोम एक चालत-फिरत विद्यापीठ…
दै.चालु वार्ता
चिखलदरा प्रतिनिधी
वासुदेव पात्रे
अमरावती (चिखलदरा) : दिसोम द लीडरशिप स्कूलचे देशभरातील फेलो २४ जुलै रोजी मेळघाटमध्ये दाखल होणार असून यामध्ये दाखल होण्यासाठी पंधरा महिने भारतभर भ्रमण करण्याची इच्छुक विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.मेळघाटातील समुदायाची जीवन पद्धती शैक्षणिक,आरोग्य,कुपोषण,बालमृत्यू या विषयाचा अभ्यास समजून घेणार आहेत.तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था,व्यक्ती यांना भेटून विविध पैलू जाणून घेतल्या जाणार आहेत.
आजपर्यंत दिसोम द लीडरशिप स्कूल ने अकरा राज्याचा अभ्यास केला आहे.त्यामध्ये हिमाचल प्रदेश,जम्मू काश्मीर,पंजाब,उत्तराखंड,ओडिसा,आंध्रप्रदेश,तमिळनाडू,कर्नाटक,तेलंगना आणि मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याचा प्रवास सुरू आहे.महाराष्ट्रातील नागपूर,नागलोक,सेवाग्राम,वर्धा याठिकाणी राहून २९ जुलै पर्यंत दिसोम द लीडरशिप स्कूल या चालत्या फिरत्या विद्यापीठाचा दौरा राहणार असून मूल्ये आधारित तत्व,समता आणि नैतिकता हा प्रवासाचा केंद्र बिंदू राहणार आहे.
