दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
पुणे वाघोली : विमान नगर वडगाव शेरी व खराडी या भागातील विकास व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी अराजकीय व्यासपीठ पुणे 14 डेव्हलपमेंट फाउंडेशन ची स्थापना व उद्घाटन स्वातंत्र्यदिन चाचत्य साधून चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी लांडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच फाउंडेशन मार्फत चकाचक पुणे 14 या स्वच्छत मोहीम ची सुरुवात व उद्घाटन करण्यात आले. तसेच पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य संकेत गलांडे म्हणाले, गेल्या अनेक दिवस या भागातील नागरिक एक राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याची मागणी करत होते ज्या माध्यमातून विमान नगर वडगाव शेरी व खराडी या भागात सर्वांगीण विकासासाठी या फाउंडेशन मार्फत सामाजिक काम व उपक्रम राबवता येतील त्या अनुषंगाने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून सुरुवातीलाच चकाचक पुणे 14 हे स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम ची आम्ही सुरुवात केली आहे फाउंडेशन मध्ये या भागातील अनेक डॉक्टर शिक्षक व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन काम करत आहे.
यावेळी विनोद गलांडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पसारकर काका, पंडित जी पिंगळे, सुभाष येवले ,ऋषिकेश भोजने, ज्योती खरात, मयूर जाधव, भारती मॅडम ,प्रतीक झुरुंगे, कल्पेश बोराडे ,विराज पवार, किरण मोरे, अक्षय गायकवाड, आयुष उंडे, दै. चालू वार्ताचे पत्रकार स्वरूप गिरमकर व अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
