दै.चालू वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
17 ऑगस्ट पिंपरी ( पुणे )
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षानिमित्त घरोघरी देशभक्ती जागृत होत आहे. यातच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने शहीद जवानांना व इरशाळवाडीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून स्वतंत्र्याचा राष्ट्रीय सण साजरा केला वृक्षमित्र अरूण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणुन मराठवाडा जनविकास संघ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरुण पवार, अल्फा लाव्हलचे कामगार प्रतिनिधी व गुणवंत कामगार किरण देशमुख यांची उपस्थिती लाभली.
यावेळी गुणवंत कामगारांना आण्णा जोगदंड यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यागासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतीला उजळ देऊन “हिंदुस्तानची शान तिरंगा आपला स्वाभिमान “भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या . देशभक्तीपर गीते लावली . जोगदंड यांनी राष्ट्रध्वजाची रचना पिंगळी व्यंकय्या यांनी 1921 मध्ये 30 देशाच्या राष्ट्रध्वजांचा सखोल अभ्यासनिय मार्गदर्शन करून केले . यामध्ये 1931 मध्ये संसदेत ठराव मंजूर करून लाल रंग काढून केशरी रंग दिला, तिरंग्यात अशोक चक्राचा समावेश केल्याची माहिती उपस्थितांना दिली.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अरुण पवार यांचा कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक अनिल कारळे यांनी सन्मान केला, तसेच त्यांनी उपस्थित गुणवंताना आणि जिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी आधिकारी, नियुक्त झालेल्या गुणवंत कामगारांना मानवी हक्क कायद्याने पुस्तक व फुलं देऊन सन्मानित करण्यात केले.
त्यांनी मराठवाडा व भंडारा डोंगरावर आणि पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास एक लाख झाडे लावली आहे आणि गेल्या पाच वर्षापासून पाणी घालून जगवली पण आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वी पिंपळे गुरव येथे 52 प्रकारचे 11 हजार वृक्ष वाटप करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना अरुण पवार म्हणाले की ” ही दोस्ती तुटायची नाही असा संदेश आपल्यासाठी आणी आपण लावलेल्या वृक्षासाठी आहे़ असे ते म्हणाले . तसेच पिंपरी चिंचवड मध्ये वृक्ष लागवडीसाठी व संवर्धनासाठी मदत लागल्यास निश्चित कळवा मी आपणास निश्चित मदत करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी गुणवंत कामगारांना वृक्षासोबत मैत्री करा असा संदेश देवून . महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यालयात 10 खुर्ची कार्यालयीन वापर करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे यांनी मंडळाच्या शिवण काम वर्ग, हस्तकला वर्ग, शिष्यवृत्ती योजना, पाठयपुस्तक योजना, अशा अनेक कामगारासाठी व कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती दिली तर त्यांनी जमलेल्या जनसमुदायांस उद्देशुन केंद्रात येऊन जास्तीत जास्त कामगारांनी कामगार कल्याण मंडळाचे सभासद होण्याची आव्हान ही केले .
जेष्ट पत्रकार शिवाजीराव शिर्के म्हणाले कि माझे भाग्य आहे की 76 वा ध्वजारोहनाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले.
देशसेवा करत असताना देशासाठी बलिदान देणाऱ्या शुरवीरांच्या स्मृतीनि उजाळा देण्यात आला. गूणवंत कामगारानी अधिकाधिक वेळ समाजासाठी दिला पाहिजे असं मत व्यक्त केले.
यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी संगीता जोगदंड , दत्तात्रय अवसरकर, मुल्ला नसरुद्दीन, शंकर नानेकर, किरण देशमुख, महेश मेस्त्री, ज्ञानेश्वर मलेशेट्टी, अशोक साठे,पांडुरंग दोडके , अंबादास दरवेशकर, चंद्रकांत लवाटे, शिवराम गवस , विकास कोरे, गंगा क्षीरसागर, अण्णा गुरव, दत्तात्रय येळवंडे, सुधाकर खुडे, तसेच सुदाम शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते मानवी हक्क माहिती पुस्तक देवून करण्यात आला .
कार्यक्रमात सुदाम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत गुणवंतानी शासनाच्या विविध योजनांची फायदा घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात वृक्षमित्र अरुण पवार तसेच वृक्षमित्र किरण देशमुख यांच्या हस्ते गुणवंत कामगार शामराव गायकवाड , पंडित वनसकर, विश्वास चिलमे, प्रताप देवडकर, कवी प्रताप देवडकर, संजय चव्हाण, चंद्रकांत भालेकर, किरण कोळेकर, याचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राज्य शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार, आण्णा जोगदंड गुणवंत कामगार संगिता जोगदंड शिवाजीराव शिर्के, केंद्र संचालक अनिल कारळे, केंद्र उपसंचालीका सुरेखा मोरे, संगिता क्षीरसागर, ह.भ.प. शामराव गायकवाड, शंकर नानेकर,गुणवंत, किरण कोळेकर, ,शैलेजा आवडे, लिना रंदाळे, श्रद्धा तोडकर सह अनेक कामगार उपस्थित होते.
आण्णा जोगदंड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर अनिल कारळे यांनी आभार मानले.
