दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वेळी महविकास आघाडी मार्फत झालेले विकास कामाचे उद्घाटन सोहळा आज म्हसळा येथे पार पडला. म्हसळा वासियांनी बाईक रॅली काढून आभार मानले आणि येता निवडणूक मध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेचा साथ देण्याची घोषणा केली आणि ज्या गद्दारांनी धोका दिले त्यांची लायकी त्यांना दाखवून देऊ अशी घोषणा केली. मुस्लिम समाजाचे असंख्य बांधवांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.सत्ता असो किंवा नसो जनतेसाठी सदैव तत्पर राहीन असे विधान जिल्हा प्रमुख अनिल जी नवगणे यांनी दिले. यावेळी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री अनिल नवगणे, दक्षिण उप जिल्हाप्रमुख श्री नंदू शेठ शिर्के, माजी आमदार श्री तुकाराम सुर्वे, क्षेत्र संघटक श्री रवींद्र लाड, उपजिल्हाधिकारी युवा सेना श्री अमित म्हामुनकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. मुईज शेख, सामाजिक कार्यकर्ते श्री मुसद्दीक इनामदार, जमातुल मुस्लिम म्हसळाचे सदस्य श्री मुनीर जमादार, माजी नगरसेवक श्री सुभान हळदे, मदरसा मोहम्मदया चे चैरमेन डॉ. (शेख) सुफियान काजी, शिवसेना तालुका प्रमुख श्री सुरेश कुडेकर, अल्पसंख्यक अध्यक्ष श्री शौकत हज्वाने, नगरसेवक श्री अनिकेत पानसारे, नगरसेविका श्रीम. राखी करंबे, अजय करंबे, कौस्तुभ करडे, दिपल शिर्के आणि असंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते.
