दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद ( भू म):- संगणक व दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा त्यांचा ध्यास होता.भारतरत्न संगणकाचे जनक भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतीस भूम तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासजी शाळू ,भूम तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश शेंडगे, परंडा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद, भूम काँग्रेसचे शहर अध्यक्ष महमूद पटेल ,विमुक्त भटक्या जमाती तालुकाध्यक्ष महादेव जाधव,अविनाश बंडू शेळके कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
