दैनिक चालु वार्ता
वैजापुर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापुर (छत्रपती संभाजीनगर)-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा वैजापूर तालूक्यात येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अंतरवाली येथील पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी वैजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे डॉ. दिनेश परदेशी, मनाजी मिसाळ, प्रशांत सदाफळ, पंकज ठोंबरे, संजय बोरनारे, डॉ. राजीव डोंगरे, ॲड रमेश पाटील सावंत, डॉ. राजीव डोंगरे, मंजाहरी गाढे, प्रेम राजपूत, रणजित चव्हाण, ज्ञानेश्वर इंगळे, शैलेश चव्हाण व मराठा समाजाची उपस्थिती होती.
महालगाव (ता. वैजापूर) येथे मंगेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी सकाळी दहा वाजता दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदवला. यावेळी झालेल्या निषेध सभेत मंगेश गायकवाड यांनी भाषण केले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महालगाव येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील शिऊर येथे खालचा पाडा येथे सर्वपक्षीय व सर्व समाज बांधव मिळून निषेध सभा घेण्यात आली.
यावळी बनराव जाधव, सुनिलदादा पैठणपगारे,भास्कर आबा जाधव, वाल्मीक जाधव, प्रकाश पगारे, सिद्धार्थ पगारे, अय्युब सेठ सय्यद, मंगेश जाधव, सुनील शिरोडे, चांगदेव जाधव, बाळा पाटील जाधव,बाळू पवार, अकबर सेठ कुरेशी, शिवाजी तात्या जाधव, भानुदास आढाव, शेखर शेठ खांडगौवरे, सुदाम भाऊ जाधव, अनिल दादा भोसले, अशोक चव्हाण, मच्छिंद्र जाधव, शिवाजीराजे साळंके,नीलेश देशमुख, संजय जाधव, कमलाकर जाधव, विजय झिंजुड्ड,सर्जेराव मावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऊद्या शिऊर बंगला येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत…
