दै.चालू वार्ता
वाशिम प्रतिनिधी दिनकर गडदे
वाशिम / मौजे जयपूर येथे बंजारा समाजाच्या परमपरयेतील सर्वात महत्त्वाचा असलेला सण म्हणजे तीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगवेगळे रूपाने व परंम परेने साजरे केले जातात.
त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी. सन पूर्वीपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे तीज उत्सव कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची
पूर्वीनिच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यावर उत्सव पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतनी तिथल्या लोकांवर चांगलाच गारुड घातला आहे. पारंम पारिक वेशभूषित फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या.
डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंमपरा लोक, संस्कृती आणि वेगळेपण जपण्याचे या निमित्ताने दिसून आले. महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून ” गंन गोर”याचे महत्त्व विशद करणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सव जयपूर परिसरातील तांड्याचे नायक लोभा चव्हाण यांच्याकडे आयोजित केला जातो यावेळी मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या नायक लोका चव्हाण, मंगेश जाधव, संजय राठोड, गजानन राठोड, संतोष हिरामण चव्हाण, नयन चव्हाण, लहू चव्हाण, हरिभाऊ चव्हाण ,श्रावण जाधव, अनेक मान्यवर उपस्थित होते…
