दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर ):
समाज घडवणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दि.5 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा देगलूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बँक मॅनेजर श्री आकाश सिन्हा साहेब यांच्या हस्ते साहित्यिक समीक्षक तथा तज्ञमार्गदर्शक, इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक,युट्युब फेम शिक्षक श्री शंकर कुद्रे सहशिक्षक जिल्हा परिषदप्राथमिक शाळा सांगवी उमर (सध्या जि. प. हायस्कूल,खानापूर येथे प्रतिनियुक्तीवर ) यांचा सन्मान करण्यात आला. मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कपिल महिंद्रकर यांनी केले.
याप्रसंगी श्री अनिल होडे (रोखपाल), श्री शिवराज लाखावार (क्षेत्रीय अधिकारी) श्री पुरुषोत्तम प्रजापती (लेखापाल), श्री ओम स्वामी, श्री ज्ञानेश्वर कोंडावार, श्री शिवकुमार भुरे, श्री नितेश यादव, श्री संदीप दाउबे, श्री कपिल कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्राहकांची उपस्थिती होती.
