प्रतिनिधि/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
उत्तराखंड मधिल उत्तर काशी येथे असलेल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेले ४१ कामगार सुरक्षित रित्या बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले आहे.
12 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी साडे पाच च्या सुमारास हे कामगार तेथे काम करत असताना अचानक वरचा भाग कोसळला आणि हे कामगार आत अडकले. याच्या बचावासाठी बचाव पथक धावून आले व यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून प्रयत्न त्यांनी सुरू केले परंतू अनेक अडचणी या पथकाला आल्या कधी कधी यंत्र तुटत होती तर कधी मलबा काढण्यात अडथळे येत होते. मग यामधे रॅट मायनर्स हे खास पथक बचाव मोहिमेत सहभागी झाले.या दोन्हीही पथकाने खूप संयमाने आपली जबाबदरीन पार पाडत आपली मेहनत हिमतीने चालू ठेवली. एनआरडीएफ (NDRF) आणि अनेक बचाव पथकांच्या मदतीने तब्बल 17 दिवसांनी कामगारांना बाहेर काढण्यात यश.ड्रिल मशीन चा वापर केल्यास धोका आहे असे समजल्यावर यांनी छन्नी व हातोड्याच्या मदतीने यांनी बचाव कार्य केले.प्रबळ इच्छाशक्ती आणि कुटुंबियांना भेटण्याची आस यामुळे त्यांनी मिट्ट अंधाऱ्या बोगद्यात तब्बल 400 हून अधिक तास लढा दिला.बचाव यंत्रणनेच्या मदतीने त्यांचं कुटुंबियांशी बोलणं सुरु होतं.
कोणाचंआई-वडिलांबरोबर, कोणाची पत्नीबरोबर, तर कोणाचं मुलांसोबत झालेलं बोलणं या कामगारांना जगण्याचं नव बळ देत होतं.बोगद्यातील कामगारांशी सहा इंची पाईपव्दारे संपर्क चालू होता. या पाईप मार्फतच त्यांना जेवणही पुरवले जात होते. बोगद्यात आणि विशेष म्हणजे बोगद्यात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत होता. सुटका झालेल्या या कामगारांना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
