गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा :-नुकतीच राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त पानभोसीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.राजश्रीताई मनोहर पाटील भोसीकर यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ६ व्यक्तींना विशेष निमंत्रित म्हणून नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर निवडी पार पडल्या.यात एकमेव राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त असलेल्या सतत ग्रामविकासाचा ध्यास, तळागाळातील गोरगरीबांच्या समस्यांना प्राधान्य देणाऱ्या ग्रामविकासाभिमुख नेतृत्व असलेल्या, निष्काम सेवा करणाऱ्या थोर कर्तृत्ववान पानभोसीच्या सरपंच सौ.राजश्रीताई मनोहर पाटील भोसीकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सदरील निवडीबद्दल मनोहर पाटील भोसीकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार सह आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
