गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
भारतात माझा महाराष्ट्र ठळक राज्य म्हणून ओळखले जाते.छ.शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वामुळे जगात आपल्या स्वाभिमानी वृत्तीचा ठसा उमटविला आहे.माझ्या महाराष्ट्र मी पूर्वी व्दिभाषिक भाषिक राज्याची विधानसभा म्हणून माझी ख्याती होती.१९५२ विधानसभेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले आमदार महोदय आल्याने मला खुप आनंद झाला.त्यावेळी ऐतिहासिक कंधार विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिले आमदार दिवंगत गोविंदराव मोरे साहेब टेळकीकर यांचे आगमण झाले.पण मला अभिमानाने सांगावे असे वाटते की,जेंव्हा १९५७ च्या दुसर्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मन्याड खोर्यातील उदयोन्मुख युवा आमदार म्हणून भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या रुपाने मिळाला.त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे माझ्यात कामकाज सुरु असतांना सर्वात प्रथम प्रवेश करायचे अन् कामकाज संपताच सर्वात शेवटी बाहेर पडणारे ते एकमेव आमदार महोदय होते.त्यांची कार्य प्रणाली सर्व आमदारापेक्षा वेगळा ठसा उमटवून घडलेले निर्भीड व्यक्तीमत्व.ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी उद्घाटक म्हणून व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार यशवंतरावजी चव्हाण साहेब तर अध्यक्ष म्हणून उपमंत्री मा. नामदार शंकरराव चव्हाण साहेब उपस्थित होते. या शाळेचे उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रास्ताविकात भाई धोंडगे साहेबांनी मातोश्रीच्या इच्छेनुसार या भागातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या काॅलेजचे शिक्षण घेता यावं म्हणून कंधार येथे शिवाजी मोफत काॅलेज सुरू करण्याचा मानस व्यक्त करून “आधी लग्न कॉलेजचे आणि नंतरच केशवाचे” अशी ऐतिहासिक शपथ घेऊन कॉलेज काढल्याशिवाय मी लग्नच करणार नाही असा दृढ संकल्प केला.
दि.१ नोव्हेंबर १९५८ दिनविशेष
वीर सत्याग्रही भाई केशवराव धोंडगे!
सीमा भागाच्या प्रश्नांसाठी भालकी सत्याग्रह (दीड महिन्याची जेल)
मराठवाडा महाराष्ट्रात सामील होताना बिदर व नांदेड जिल्ह्याची फोड होऊन काही तालुके कर्नाटकात व आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आले. बेळगाव, कारवार, भालकी, संतपूर ,हुमनाबाद ,औराद ,मुधोळ, म्हैसा आणि निपाणी मराठी भाषा बोलले जाणारे तालुके महाराष्ट्रात आले नाहीत. त्यामुळे हा भाग महाराष्ट्राला जोडून महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी! या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षानी एकत्र येऊन चळवळ सुरू केली.कंधार तालुक्यातही केशवरावांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी सत्याग्रह केले. साडेचार हजार लोकांना अटक झाली.१ नोव्हेंबर १९५८ रोजी भालकी तहसिल कचेरीवर भाई केशवरावांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला.१९५७-१९५८ वर्षीचे दिनविशेष
मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत भाई धोंडगे यांचे योगदान व आपल्या गावी लोकसभा कडून महाराष्ट्रातील एकमेव संयुक्त महाराष्ट्रात निर्मितीचे विजयी टावर क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार येथे उभारले!
सन १९५७-१९५८ च्या दरम्यान महाराष्ट्रातील जनतेने मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उठाव करून मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्राचे चळवळ सबंध महाराष्ट्रभर पसरवली. १९५७ ला भाई केशवरावजी धोंडगे कंधार तालुक्याचे आमदार होते. मुंबई येथे निघालेल्या महामोर्चात व दिल्ली लोकसभेवर निघालेल्या धडक मोर्चात भाई केशवराव धोंडगे साहेबांनी आपल्या सहकार्यांना पाठवले.मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कंधारलाही सतत मोर्चे सत्याग्रह भाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कंधार तालुक्यातील साडेतीन हजार लोकांना या चळवळीत अटक होऊन जेल झाली.त्यातच माझा महाराष्ट्र ०१ मे १९६० रोजी १०८ शूर हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्र लढ्यातून महाराष्ट्र कामगार दिनी निर्माण झाला.सन् १९६० पासून मझ्या विधानसभेत औरंगाबाद येथे माझ्या विधान मंडळाचे अधिवेशन घेण्याची मागणी मन्याड खोऱ्याच्या वतीने भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या रूपाने पांचाळपूर नगरीची राष्ट्रकूट कालीन राजधानीची कंधारी तोफ सतत गर्जत राहिली.स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १९६२ रोजी महाराष्ट्र विधानसभेतची निवडणुक कंधार मतदारसंघातून भाई केशवराव धोंडगे यांनी दुसऱ्यांदा निवडणुक लढविली त्यावेळी कंधार मतदारसंघानी पुन्हा माझा प्रिय प्रतिनिधी म्हणून भाई मुक्ताईसुतास पाठवले.
दि.१३ सप्टेंबर १९६३ दि.१८ नोव्हेंबर १९७३,दि.१ ऑगस्ट १९८०,दि.३ एप्रिल १९९३ अनेक वेळा सातत्याने प्रस्ताव मांडला यश मात्र ,दि.३० जुलै १९६३ या दिनी यश मिळाले. औरंगाबाद येथे अधिवेशन घेण्याची मागणी सातत्याने लावून धरली.मन्याड धरणाचा लढा भाई धोंडगेसह ४० कार्यकर्त्यांना व मातोश्री मुक्ताई सह महिलांना अटक!
मन्याडनदीवर तुकाईच्या मळाला धरून धरण बांधल्यास कंधार तालुक्यातील भागा सुजलाम सुफलाम होईल यासाठी केशवरावांनी १९५८ ते १९६० या कालखंडात शासनाकडे सतत मागणी केली. ही मागणी मोघम नव्हती, तर या धरणाचा अभ्यास करून ही मागणी करण्यात आली होती. निजाम राजवटी देखील या धरणासंबंधी मोजणी झाल्याचा संदर्भ होता या धरणास शिवाजी धरण असे नाव देऊन हे धरण साकारल्यास वीस हजार एकर जमीन ओलीताखाली येते असा अभ्यास करून भाई केशवराव धोंडगे साहेब, आमदार उद्धवराव पाटील, आमदार अण्णासाहेब गव्हाणे, आमदार दत्ता देशमुख व भाई गुरुनाथराव कुरुडे यांचे शिष्टमंडळ तात्कालीन मुख्यमंत्री मा.ना.यशवंतराव चव्हाण साहेबांना भेटले. भाई धोंडगे साहेबांची दूरदृष्टी व समाज हिताचे कष्ट पाहून यशवंतरावना खूप आनंद झाला. या आनंदात ते बोलून गेले या धरणाला “शिवाजी धरणापेक्षा धोंडगे धरण” नाव द्यावे लागेल. एवढे प्रयत्न केशवरांनी केले आहेत. तज्ञांकडून प्रस्ताव तपासून निश्चित विचार करण्याचे काम मान्य केले परंतु या कामात तथाकथित राजकारण्यांनी धोंडगे साहेबांचे राजकारण संपवण्यासाठी त्यांच्याबद्दल अफवा पसरली व हे धरण रद्द करण्यात आले. शासकीय यंत्रणात येवढ्यावर थांबली नाही, तर त्यांनी बारूळ वरवंटच्या धरणाची जागा निश्चित केली. व कामास सुरुवात झाली. हे धरण रद्द करण्यासाठी केशवरावजी धोंडगे व सहकार्यानी आंदोलना केली. तात्कालीन मुख्यमंत्री मा.ना. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते सदर धरणाचे भूमिपूजन होणार होते पण भूमिपूजनाच्या अगोदर या भागात कलम १४४ लागू करून भाई धोंडगे साहेबांसह त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. भाई गुरुनाथराव कुरुडे,भाई पंढरीनाथराव कुरुडे,माणिकराव कळणे आदींना अटक करण्याचा खुप प्रयत्न झाला पण व्यर्थ.त्यावेळी मातोश्री मुक्ताईने शेकडो स्त्रियांना घेऊन भूमिपूजनाचे ठिकाण गऊळ ते बारुळ पायी जावून सत्याग्रह केला.त्यांनाही वाटेतच आडवून अटक केली.मा.ना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या महिलांना सोडून देण्यात आले.१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली व दिवशी सत्याग्रहींची शिक्षा माफ करण्यात आली.
नंतर १९६७ रोजी माझ्या सदस्यांची निवडून कंधार मतदारसंघातून पुन्हा माझ्या सभागृहात डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब आले.दि.१६ डिसेंबर १९७१ वर्षातली घटना संपूर्ण भारतात एकमेव स्मारक जय बांगला विजयी स्मारक भावी पिढीला इतिहास माहिती व्हावे म्हणून स्मारकाची उभारणी.कंधार येथे भारत देशातील पहिले “जय बांगला विजयी” स्मारक विजय गडावर साकार!
१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशची निर्मिती झाली त्यासाठी भारतातर्फे त्यांच्या मागणीवरून या या शूर मर्दिनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्य मदतीसाठी पाठवले होते त्यामुळे शेख मुजबूर रहमान बांगलादेशचे पहिले पंतप्रधान यांना विजय प्राप्त होऊन बांगलादेश पाकिस्तान फुटून स्वतंत्र देश बांगलादेश झाला.एव्हढेच काय माझे वडील बंधु म्हणजे भारतीय लोकसभा या संसदेत भाई केशवराव धोंडगे खासदार असतांना तत्कालीन सांसद इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध सत्ताधारी एकवटले तेंव्हा एकटे भाई त्यांच्या बाजुने किल्ला लढवून त्यांची खासदारकी टिकविण्यासाठी आभ्यासपूर्ण भाषणाने लोकसभा स्तब्द झाली.त्या नंतर इंदिरा गांधी यांची भेट होताच “बडी मेहरबानी हुई, धोंडगे साहब शुक्रिया”असे उद्गार इंदिरांजीनी काढले.माझ्या सभागृहात १९५७,१९६२,१९६७ व १९७२ अशी चार टर्म आणीबाणी नंतरची लोकसभा आणि त्यानंतर दोन टर्म १९८५ व१९९० या टर्म मध्ये कंधार मतदारसंघाचे नेतृत्व केले.कंधार मतदार संघात अनेक वाडी-तांड्यांना मौजाचा दर्जा देण्यास प्रस्ताव मांडले.दि. ०९ ऑगस्ट १९९० रोजी माझ्यात होणाऱ्या कामकाजाची सुरुवात वंदेमातरम राष्ट्रीय गीताने व्हावे यासाठी ३४\१७ स्थगन प्रस्ताव व्दारे मागणी करून ठराव पारीत करुन घेतले.१९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्यातले साहित्यिक अंग जोमाने विकसीत होवून ३५ ते ४० ग्रंथ संपदा निर्माण झाली.डाॅ.भाई मुक्ताईसुत केशवराव धोंडगे यांनी माझी प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी हंगामी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आदर्श आमदार अशा कितीतरी उपाध्या कमी पडतील. विविध ग्रंथ लेखन करतांना शहिदे आजम युगपुरुष छ.संभाजी महाराज यांना शंभर-दिडशे विशेषणे लावली.मलाही वाटले आपणही त्यांना शंभराच्या वर विशेषणे महाराष्ट्रातील नव्हे देशातील विद्रोही विचारवंत,थोर शिक्षण महर्षि,रेकॉर्ड ब्रेक सत्याग्रहाचे निर्माते,उत्कृष्ट संसदपटू,जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे जनक,आदर्श लोकप्रतिनिधी,सा.जयक्रांतिचे संपादक,
समाज शिल्पकार,क्रांतिवीर,साहित्यिक,कवि,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक,आयुष्य नुकतेच शतक पार करणारे,तत्त्वनिष्ठ व्यक्तीमत्व,निर्भीड अन् फर्डे वक्तृत्व,अजानबाहू शरीरयष्टीचे ,महाराष्ट्र विधानसभेत कामकाजाची सुरुवात वंदेमातरम राष्ट्रीय गीताने व्हावी यासाठी ३४\१७ स्थगन प्रस्ताव मांडून मान्य करुन घेणारे आमदार,आणीबाणीस कडाडून विरुध्द करून वीर सत्याग्रही म्हणून, महिनोगणती जेल भोगणारे,विविध स्मारकाचे संयोजक, गनीमी कावा वापरुन ऐतिहासिक कंधार शहरातील शिवाजी चौकात शिवस्मारक,माॅ.जिजाऊ स्मारक निर्माणकर्ते,लोहा शहरास तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देणारे,लोहा मोड वरील शिवस्मारकाची जागा १९७२ साली मिळवून घेणारे,शिवस्मारकासाठी सत्याग्रह करणारे,अप्पर शिवाजी धरणाचे शिल्पकार,नेहमी सत्तेच्या विरुध्द सतत राहून समाज उन्नतीसाठी झटणारे,पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन माता-भगींना घेता यावे यासाठी विधिमंडळात आवाज उठवणारे,तत्कालीन अधिकारी वर्गाच्या उरात धडकी भरवणारे,स्वतःच्या फोटोचे होर्डिग्ज फाडणार्या समाजकंटकांना माफ करुन पोलिस स्टेशन मधुन सोडवणारे,हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या तीक्षक्षेत्री रथयात्रा संयोजक,कार्तिकी एकादशीस समता दिंडीचे संयोजक,१७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्राम विजयी दिनी रजाकारा विरुध्द आवाज उठविणाऱ्या शूर हुतात्म्ये अन् स्वातंत्र्य सैनिकांचे कदरदान,हुतात्म्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करणारे,शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील पुलाचे निर्माते,औरंगाबाद येथे राज्याची उपराजधानी करुन वर्षात एकदा विधानसभेचे अधिवेशन घेण्याची सतत मागणी लावून धरणारे,श्री व्दादशभुजादेवी मंदिरात देवीची मुर्ती प्राणप्रतिष्ठाणा करुन छ.शिवाजी महाराज व म.बसवेश्वर महाराज यांची संयुक्त यात्रा भरवणारे,दिवंगत भाई झोटींगराव पाटील पहिलवान मुंडे आखाड्यात पराभव झाल्यानंतर मल्लांना बक्षीस देणारे,आपल्याच ठार मारण्यासाठी आलेल्या रुक्म्या डाकूना गुराखीपिठावर साखरेत तोलणारे,वडार समाजतील मायमऊल्या चोळी घालत नसत,तेंव्हा चोळ्या घालण्याचा ( चोळ्या वाटप करुन सामाजिक क्रांतिचा) ऐतिहासिक कंधारच्या शिवाजी चौकात कार्यक्रम करणारे, राष्ट्रकूट कालिन शिल्पकला जतन करणारे,सर्वलोकाश्रय मंडप निर्माणकर्ते,सहस्र मुखी महावीर स्तंभाचे संयोजक,संत गुरु नानकदेवजी महाराज व संत नामदेव महाराज या मंदिराचे संयोजक, कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिराचे निर्माते, गनीमी काव्याने कंधारच्या जिजाऊ माॅ.साहेब स्मारकाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व स्मारकाचे निर्माणकर्ते,माळेगाव यात्रेतील दोन दिवस विविध परिषदा घेवून न्याय मिळवून घेणारे,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील शिवस्मारक निर्माते,मान-पान आपल्याच घराण्याचा गावाला अर्पण करणारे, जयक्रांति घोषणेचे पुरस्कर्ते वेळेला महत्व देणारे,मातृभक्त,म.फुले पुण्यतिथी निमित्त संस्थेत संयुक्तपणे साजरी कर्ते,दुध देणाऱ्या मोत्या बैलास प्रसिध्द देणारे,गुराखी साहित्य संमेलनास शासनाचा १ लक्ष रुपयाची तुटपुंजी मदत नाकारुन ५ हजार रु.मध्ये टाकुन निधी परत करणारे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ निर्मितीत स्पष्ट भुमीका मांडणारे,हम सब एक है। या बॅनरखाली सलग सहा महिने सत्याग्रह कंधार मामलेदार कचेरीपुढे करणारे ,बहाद्दरपुरा शांतीघाटाचे नामकरण कर्ते,उत्कृष्ट ग्रंथ संपदा लिहून प्रकाशित करणारे सहा टर्म आमदारकी, अर्धी टर्म खासदार,आक्रमक अन् उत्कृष्ट अग्रलेख लेखनकार,जागतिक लोकनाट्य संमेलनाचे संयोजक, अनेक गावांना मौजाचा दर्जा विधानसभेत मंजुर करुन घेणारे,विविध गडाची निर्मिती करणारे,कंधार येथील वैदु काॅलनीचे निर्माणकर्ते,हु.माणिकराव काळे रोड नामकरणकर्ते,जय बांगला स्मारक अख्या भारतात एकमेव स्मारकाचे निर्माते,वन अधिकारी नांदेड कार्यालयावर सत्याग्रह करणारे,लाल कंधारी पशु संवर्धन केंद्र गऊळ नगरीत प्रथम निर्मिती,महाराष्ट्र विधानसभेत केलेला संकल्प, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगाव येथे करण्याची मागणी,तालूका स्तरावर एकमेव श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार,राष्ट्रकूट भुवन शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील शिल्प संग्रहालय निर्माण ,भालकी येथे सीमाभागावर सत्याग्रह,सा.जयक्रांतिची सुरुवात हणुमंता वडाराची सुतकी अन् राहीबाई कदम यांचा झाडू यांचा सन्मानकरी,काकांडी येथे संत गाडगे महाराज यांचा आशीर्वाद,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा दर्पण पुरस्कार,महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष,महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष ,डाॅ.पंजाबराव देशमुख संस्थेच्या शिवाजी लोकविद्यापीठाने डाॅक्टरेट पदवी बहाल केली श्री क्षेत्र वडू (बु.)येथे मिळालेला छ.संभाजी महाराज यांचे नावे मिळालेला पुरस्कार,प्रतापगडावर मातोश्री मुक्ताई यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रहाचे संयोजन,हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांना पेंशन मिळवून देण्याची मागणी,गुराखी राजांना पेंशन द्यावे ही मागणी,स्वतःच्या संस्थेतून गुराखी पेशन्स देण्याची सुरुवात,नदीजोड प्रकल्प अंमलात यावा ही मागणी,श्रीशैल्यम् आंध्रप्रदेश येथील छ. शिवाजी महाराज स्मृतिभुवन उभारण्यासाठी अर्थ साहाय्य करावे ही मागणी करत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांची ती मागणी मान्य,स्त्रीभ्रुण हत्त्या विरोधी विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजुर करुन घेणारे, महाराष्ट्र पोलिस खाकी हाफ पॅट वरुन फुल पॅटवर डाॅ.भाई धोंडगे साहेब यांचे मुळेच महाराष्ट्र विधानसभेत मंजुर,वस्ताद लहूजी साळवे नावे क्रिडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी, आपल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेत मंडल आयोग स्थापन होण्या आधीच ओबीसी मागासवर्गीय उमेदवारानां नौकरीवर घेतले, गंगाखेड ते बोधन,नांदेड ते लातूर,नांदेड ते बीदर रेल्वे मंजुर करा ही मागणी कार, पोलेवाडी येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्याना शिक्षकांनी विद्रुप करुन शिक्षा केली होती त्या विरुध्द महाराष्ट्र विधानसभेत मागणी केली ,कंधार तालुक्यात ५९ शूर हुतात्मे झाले, कंधार व टेळकी येथील हुतात्मा सारके तत्कालीन मुख्यमंत्री एम.आर.अंतुले साहेब यांनी उभारले ,नदी जोड प्रकल्प विशेषतः महाराष्ट्र व मराठवाड्यात नद्या वळवून जलसंचय करा,दिवंगत साहेबराव बारडकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह विमानाने न आणता बाय कार का आणले.ही व्यथा भाषणातून मांडतांना झालेला टाळ्यांचा कडकडाट ,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणून डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचा तत्कालीन मुख्यमंत्री स्वातंत्र्य विलासराव देशमुख साहेब यांच्या समर्थ हस्ते सत्कार,घोडज ता.कंधार येथील मन्याड नदीवर बांधलेला पुल,भालकी येथील सीमा प्रश्नांवर केलेला सत्याग्रह,१९९८ रोजी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचेवर बायपास शस्त्रक्रिया, शतकोत्सव,ना चष्मा ना काठी व्यक्तीमत्व या समाज सुधारक अवलियास विनम्रभावे अभिवंदन व मानाची कोटी-कोटी जयक्रांति.
