शिरूर सुनिल जिते..
विद्या विकास मंडळ संचलित विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथील प्राचार्य अनिल शिंदे हे दिनांक ३१ डिसेंबर २०२३रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल शाळेच्या वतीने शिंदे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मंगल शिंदे यांचा दिनांक ३० डिसेंबर २०२३ सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव तथा बापूसाहेब गावडे तर मा. खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या शुभहस्ते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, मा. आयुक्त कांतीलाल उमाप, डेप्युटी डायरेक्टर सक्तवसुली कुलदीप राजे, मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे , शिक्षण सहसंचालक हारून आत्तार, जिल्हा बँकचे मा. अध्यक्ष निवृत्ती गवारी,मा. मंत्रालय सचिव दत्तात्रय थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी घालून दिलेले आदर्श निश्चितपणे विद्यार्थी अंगीकारतील असा विश्वास बापूसाहेब गावडे यांनी व्यक्त केला. शैक्षणिक सेवेचे कौतुक करून त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त प्राचार्य अनिल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून, ३५ वर्षे आपण प्रामाणिकपणे विद्यार्थी घडविण्यासाठी काम केले. यापुढेही सामाजिकसाठी काम करतच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ते भावुक झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण व मच्छिंद्र राऊत यांनी केले कार्यक्रमास माजी सभापती सुभाष उमाप, घोडगंगा सह सा. संचालक राजेंद्र गावडे, सुहास थोरात,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, सरपंच चंद्रभागा खर्डे ,उपसरपंच योगेश पुंडे, मा. सरपंच दिपक तळोले, दादासाहेब खर्डे संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, शहाजी दळवी, सदाशिव पुंडे, भास्कर पुंडे, राजेंद्र ननवरे , रोहिदास ढगे, बाबुराव दळवी, लहू तळोले, रामकृष्ण पुंडे, तान्हाजी खर्डे, मलठणचे उपसरपंच रामचंद्र गायकवाड, मा. सरपंच नानाभाऊ फुलसुंदर, शशिकांत वाव्हाळ, उद्योजक सागर दंडवते, अमोल पुंडे आदींसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
