दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:-बारूळ येथे पतंजली योग समिती तर्फे सात दिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक १ जानेवारी २०२४ सोमवार रोजी पहाटे नवीन वर्षाच्या सुरुवातीस प्रसन्न वातावरणात योगसाधनेस प्रारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रांगणात संपन्न होत असलेल्या सात दिवशी योग शिबिरासाठी योगशिक्षक एस पी जाधव योग साधकांना मार्गदर्शन करत आहेत .कंधार मंडळाचे प्रभारी योग्य शिक्षक निळकंठ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने सातदिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या योग शिबिरात माधवराव वाघमारे, सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांत पुरी ,शंकरराव वाखर्डे, शेख अहमद , सदाशिव बनसोडे ,सदाशिव इटकापल्ले, पिंटू पाटील कोल्हे, ओम ठाकूर ,शेख मेहबूब यांचे सह अनेकांनी भाग घेतला . दिनदर्शिका २०२४ च्या डायरीचे वाटप करण्यात आले. योग साधना शिबिरासाठी बारूळ व परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले…
