दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर) : स्त्री शिक्षणाच्या उद्धारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदापुरात श्रावण बाळ आश्रमात समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या कर्तबगार महिलांचा ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा शेख यांनी सन्मान केला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार ) महिला शहर अध्यक्ष रेश्मा शेख यांनी सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई दाणी, जय इन्स्टिट्यूट नर्सिंग स्कूल च्या मार्गदर्शिका उर्मिला नायकुडे, माजी नगरसेविका राजश्रीताई मखरे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार ) शहराध्यक्ष उमाताई इंगोले व स्मिताताई पवार, एडवोकेट रेशमा गार्डे, रोहिणी राऊत, ज्योती लोंढे, उपस्थित होत्या.
ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात व समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते असे जिल्हाध्यक्ष रेश्मा शेख यांनी सांगितले. आज अशाच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सर्व महिलांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी अनेक महिलांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. जय इन्स्टिट्यूट नर्सिंग स्कूलची विद्यार्थिनी सोनी महिरूले हिने मी सावित्री बोलतेय ही एकपात्री एकांकिका सादर करून सावित्रीबाईंच्या जीवनातील बालवयापासून चे प्रसंग कथन केले.
ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारार्थी
१) अरुणा शिंगटे मा. मुख्याध्यापिका : शैक्षणिक
२) ॲड. जयश्री विठ्ठल खबाले : विधी व न्याय विभाग
३) तोयशा राजू धांडे, सोनी विलास महिरुले : सांस्कृतिक
४) अपर्णा जाधव पोलीस उपनिरीक्षक : पोलीस विभाग
५) माधुरी लडकत महिला पोलीस कॉन्स्टेबल : पोलीस
६) बकुळा बाबासो शेंडे : दक्षता कमिटी
७) छाया पडसळकर : राजकीय
८) माधवी सोननीस, कल्पना भोर : सामाजिक
९) डॉ. परविन पठाण : वैद्यकीय
सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्य साधून ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानाबरोबरच बाल विकास केंद्र येथे शालेय साहित्य व जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल येथे फळ वाटपाचा व श्रावण बाळ आश्रमात फळवाटप व शालेय साहित्य , झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले असा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला अशी माहिती जिल्हाध्यक्ष रेश्मा शेख यांनी दिली.
