दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर
दि.4 जानेवारी रोजी हानोबाची वाडी ता. पैठण जि. छ. संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष गजानंद बोहरा यांच्या पुढाकाराने कलश यात्रा काढुन येत्या 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील भव्य दिव्य अशा मंदिरामधे श्रीरामलला विराजमान होणार आहे, या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची संपूर्ण भारत देशात घरोघरी जाऊन अक्षदा आणी पत्रीका वाटप करुन 22 जानेवारीला पुन्हा एकदा दिवाळी सारखाच आनंदोत्सव साजरा करायचा आहे याची माहीती गजानंद बोहरा व सर्वच रामभक्तांकडुन घरोघरी जाऊन देन्यात आली. सर्वप्रथम 7 कुमारीकांना कलश पुजन करुन देन्यात आले व हनुमान मंदीरामधे नारळ फोडुन संपूर्ण गावभर कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली, गजानंद बोहरा यांच्याकडुन जय श्रीराम म्हणत जय घोषाला सुरुवात करण्यात आली व संपुर्ण गाव श्रीरामाच्या जय घोषाने दुमदुमले, तसेच संपुर्ण गावकरी या भक्तीमय वातावरणात, आनंदाच्या ऊत्साहात, श्रीरामाच्या कलश यात्रेत आनंदमय झाले. या कलश यात्रे दरम्यान गजानंद बोहरा यांच्याकडुन पत्रके वाटप करत आयोध्या येथे बनलेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराविषयी सवीस्तर माहीती जनतेला सांगण्यात आली. यावेळी ग्रा.सदस्य कैलास वैष्णव, पुनम बहुरे, राजकुमार वैष्णव, रमेश बिघोत, ऊदल स्वामी महाराज, केसरसींग बहुरे, मुख्याध्यापक अर्जुन पिवळ, शांतेश्वर परमशेट्टी, सुरजदास वैष्णव, हारसींग महेर, प्रेमसींग बिघोत, शिवसींग जारवाल, केवल गुसींगे, मनोज वैष्णव, कचरु बिघोत, महाजन, मलखान, रामधन, गणेश, पवन बहुरे, रामसींग, केसरसींग, भागचंद, मदन, अजबसिंग, चरण, विठ्ठल जारवाल, शाम वैष्णव, संजय ठाकुर, चंपालाल, प्रताप बिघोत, निहालसींग सुलाने, शंकर राठोड, संतोष जाधव, कडुबा, सुभाष, अर्जुन मोघे, रमेश आरसूड, किशोर मोघे, केरुबा आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
