दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी :- दशरथ आंबेकर
नांदेड/किनवट:-मराठवाड्यात महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा चालु असुन सामाजिक सुरक्षा, शेतकरी केसीसी नुतनीकरण, बचतगट महीला मेळावा, डिजिटल व वित्तीय साक्षरता मेळावा, वृक्षारोपण यावर महत्व पटवून सांगितले.
इस्लापुर येथे गुरूवारी सायंकाळी महाराष्ट्र ग्रामीण बॅक समोर मंडपात पिक कर्ज नुतनीकरण केलेल्या शेतकरी विनायकराव देशमुख, दिंगाबर जाधव, नंदकुमार गादेवार, सुनिल आडे, गणेश जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक सर व्यवस्थापक संगमकर,सर व्यवस्थापक षण्मुख वानखेडे, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती याच्या हस्ते शाल, हार, गुलदस्त्या देवुन गौरविण्यात आले. तर नारी सक्ती, साईबाबा महीला, वैष्णवी महीला, भिमा माता, प्रगती महीला, लक्ष्मी स्वयसहायत्ता, दुर्गा माता या सर्व महीला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, अरूना कोटुलवार,पार्वता खंदारे, शांताबाई खोकले, मंगल सुदेवाड, वंदना कांबळे, कांताबाई पाचपुते, जयश्री पाचपुते, यशोदाबाई टारपे, सुनीता देशमुखे, लक्ष्मीबाई माझळकर, सुनीता धनवे याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विषेशता फक्त २० रूपया मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा असुन दोन लाख रुपयांचा विमा आहे तर ४३६ रूपयात प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना असुन यात नैसर्गिक मृत्यू विज पडुन, अपघात,मृत्यु झालेल्या पंडीत रामा झाडे, रीठ्ठा तांडा,संजय संभाजी हराळे कोल्हारी,गोपीनाथ भट्टेवाड इस्लापुर, जगदिश पडवळे सावरगाव तांडा,नंदु जाधव पागरी तांडा,विनाबाई आडे नंदगाव तांडा,नारायन टारफे सांगवी,सरेनकुमार व्यंकटेश झरीवाड चिखली,दिपसिंग मोहन आडे नंदगाव तांडा याच्या वारसदार याना प्रतेकी दोन लाख रूपयाचा विमा पुर्वी देण्यात आला.तसेच उत्कुष्ट केसीसी वसुली केल्याने शाखा व्यवस्थापक शेख, शिवनी शाखा व्यवस्थापक चव्हाण यांचा विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती यांनी शाल, हार, गुलदस्त्या देवुन सत्कार केला यावेळी मंचावर सहाय्यक सर व्यवस्थापक संगमकर, षण्मुख वानखेडे, नादेड चे क्षत्रिय व्यवस्थापक संतोष प्रभावती, शाखा व्यवस्थापक शेख, दिनेश खालापुरे, रूपेश पांडे, अक्षय थोरात, गणेश जगताप उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचालन सुनिल आडे यानी केले तर आभार शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक शेख, सहाय्यक व्यवस्थापक निखील पोगुलवाड,रोखपाल सुभाष बोईनवाड, मोहन पाथोडे, उत्तम गायकवाड, ग्राहक सेवा केंद्राचे चालक गणेश जयस्वाल, चंद्रकांत जाधव, राजेश आडे, अविनाश कावळे यांनी यशस्वी केले.
